दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष,
राज्याच्या निवडणुका कधी लागतील,याविषयी शिगेला पोहोचलेली उत्कंठा कदाचित आज सांयकाळी चार वाजता संपुष्टात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली १४ जणांचे पथक काल मुंबईत आले असून त्यांनी गेल्या दोन दिवसात अनेक विभाग व राजकीय पक्षांच्या नेत्यासोबत बैठका घेतल्या.या बैठकीतून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आज सांयकाळी चार वाजता त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका या १५ व १७ नोव्हें.अशा दोन दिवशी होतील,तर २० नोव्हें.ला मतमोजणी होईल,अशी शक्यता आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांनी ही निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली आहे.नोव्हें.मध्ये होणाऱ्या या निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टो.महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू होईल, असा अंदाज राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
आयोगाची लगबग लक्षात घेऊन शिंदे सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठ्याप्रमाणात विविध विकासकामाना मंजुरी दिली.त्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या सर्व घडामोडीच्या पार्श्ववभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला आहे.भाजप पितृपक्ष संपताच आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करणार आहे.त्यासाठी
अमित शाह पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
भाजप नेते,गृहमंत्री अमित शाह हे २४ सप्टें.ला महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते.त्यांनी आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये विदर्भ,मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांचा आढावा घेतला.भाजपची विधानसभेसाठी करण्यात आलेली तयारी अंतिम टप्प्यात आहे.तर महाविकास आघाडीनेही आपल्या उमेदवारांच्या यादीवर अंतिम हात फिरवण्याच्या कामाला गती दिली आहे.महाराष्ट्रसोबत झारखंड,या राज्याची मदतही संपत असून या राज्याच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.त्यामुळे आयोगाचे हे पथक दिल्लीत गेल्यानंतर दोन्ही राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करते कि आजच्या पत्रकार परिषदेत फक्त महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

