प्रवीण दवणे,
डहाणू येथे झालेल्या लेखनस्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
मोबाईलच्या विळख्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थी लेखन व काव्यलेखन स्पर्धेत चुणूक दाखवून विविध विषयांवर आपला ठसा उमटवत आहे.त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,यासाठी कोमसाप पालघर शाखा विविध उपक्रम राबवत असते.
आज के.एल.पोंदा शाळेत कोकण मराठी साहित्य परिषद,डहाणू शाखेने डहाणू तालुकास्तरीय लेखन व काव्यलेखस्पर्धेचे
व सन २०२३ साली विजेत्या स्पर्धका़ना बक्षीस पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते.याप्रसंगी दि डहाणू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तरुणभाई पोंदा,सचीव सुधीर कामत,प्राचार्य सोपान इंगळे,कोमसाप पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे, शाखाध्यक्षा डॉ.अंजली मस्करेन्हस,सेवानिवृत्त
कर्मचारी संघांचे तालुकाध्यक्ष मारुती वाघमारे,कार्यकारीणी सदस्य वसंत तांडेल,दिलीप जोंधळेकर,नीता नहार आदी मान्यवर उपस्थित होते.
डहाणू तालुक्यातील १४ शाळा,
महाविद्यालयातील एकूण ४२ विद्यार्थी,विद्यार्थीनीं या कार्यक्रमात सहभागी झाले होते.लेखन स्पर्धेत मोबाईलचा शिक्षणासाठी वापर,श्रमप्रतिष्ठा हीच जीवन निष्ठा,विज्ञानाने मानव सुखी झाला का?,आम्ही आता मतदार झालो,माणूस हरवला आहे तर काव्य स्पर्धेसाठी ” बस झाला आता अत्याचाराचा अतिरेक,” किमयागार निसर्गावर प्रेम आहे माझे,शुध्द राजकारण, माझी जबाबदारी पेलेन मी समर्थपणे,इ.ज्वल़ंत विषयावर विषय देण्यात आले होते.पारितोषिक वितरण समारंभाच्या सुरुवातीला कार्याध्यक्षा प्रा.मेघा पाटील यांनी प्रास्ताविकेत डहाणू शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीसे व पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रजनी ताजणे यांनी केले तर कार्यवाह प्रीती राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

