दीपक मोहिते,
सरकार निवडणुकांना घाबरतय,
महाराष्ट्र शासनाकडून जारी
झालेल्या आदेशानुसार उद्या होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केले आहे.त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या निवडणुकीत पराभव झाल्यास त्याचा परिणाम आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल,अशा भितीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची ( सिनेट ) निवडणूक गेल्या अडीच वर्षापासून रखडल्या आहेत.या काळात दोन वेळा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर आता विद्यापीठाने २२ सप्टें.ला ही निवडणूक घ्यायचं ठरवलं होते.पण ही निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.परिपत्रकात स्थगितीचे नेमके व सबळ असे कारण देण्यात आलेलं नाही.दरम्यान,निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संताप व्यक्त केला आहे.
मुंबई विद्यापीठ अधिसभा ( सिनेट ) सदस्य निवडणूकीचे मतदान उद्या घेण्यात येणार होते. शेवटच्या क्षणी विद्यापीठ प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या दबावाला बळी पडून निवडणूक प्रक्रिया अस्थायी कालावधीसाठी स्थगित करणे,हा लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे.सुरळीत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या विद्यापीठाचा हा निर्णय पदवीधरांसाठी अपमानास्पद आहे,अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकला. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकत त्यांना निवडणुकांना स्थगिती देण्यास भाग पाडले.गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेणे,हे अत्यंत दुर्दैवी आहे.या विषयात अभाविपचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार आहे.
शेवटच्या घटकेला विद्यापीठ प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या दबावाला बळी पडून निवडणूक प्रक्रिया अस्थायी कालावधीसाठी स्थगित करणे हा लोकशाहीचा अपमान आहे.
असे घाबरट गद्दार मिंधे मुख्यमंत्री आणि अकार्यक्षम शिक्षणमंत्री असले की तरुणांच्या ताकदीला असेच घाबरतात,२२ तारखेला होणारी सिनेट निवडणुक ‘सरकारच्या आदेशावरुन रद्द केली’…डरते रहो, यह डर अच्छा हैं! लेकिन हम अपने लोकतंत्र के लिए लड़ेंगे और जीतेंगे!, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

