पालघर,
मच्छीबाजार फुलले ; खवय्यांची चंगळ सुरू,
मात्र,माश्यांच्या दरात प्रचंड वाढ,
गेल्या नारळी पौर्णिमेनंतर खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाली.आता मच्छिमार बोटी समुद्रकिनारी परंतु लागल्या आहेत.येथे असलेल्या जेट्ट्या गजबजल्या असून मच्छीचे बाजारही सध्या तेजीत आले आहेत.
दोन महिन्यांच्या बंदीच्या काळानंतर मासेमारीसाठी गेलेल्या बोटी आता परतू लागल्या आहेत.त्यामुळे सकाळच्या प्रहरी समुद्रकिनारी घाऊक मासेखरेदी करण्यासाठी दररोज झुंबड उडत आहे.समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना मासे भरपूर मिळाल्यामुळे मच्छीमारांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.सरंगा,हलवा,सुरमई,बोंबील,कर्ली,कोळंबी,मुशी व अन्य माश्यानी मच्छीबाजार फुलून गेले आहेत.श्रावण महिना संपल्यामुळे खवय्यानीही आपला मोर्चा मच्छीबाजारच्या दिशेने वळवला आहे.रवि,बुध व शुक्र.अशा तीन दिवशी मच्छीबाजारात प्रचंड गर्दी होत असते.तसेच मच्छीच्या दरातही ४० ते ५० रु.ने वाढ झाली आहे.तरीही खवय्ये मोठ्याप्रमाणात मासे खरेदी करत आहेत.

