दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” काका हा काकाच असतो,”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक मी बारामतीमधून लढवू इच्छित नाही,असे जाहीर केले आहे.आपल्या पत्नीचा लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव,पत्नी व दोन मुले वगळता संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या विरोधात जाणे,आपल्या काकांचा पक्ष,आमदार पळवणे,इ.बाबी बारामतीकरांच्या मनाला पटल्या नाहीत.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जबर फटका बसला होता.त्यामुळे अजित पवार हे वारंवार नाझ्याकडून अनेक चूका झाल्याचे सांगत फिरत आहेत.विधानसभा निवडणुकीतही आपला पराभव होईल,अशा भितीमुळे अजित पवार आता चांगलेच नरमले आहेत.महायुतीमधील एकनाथ शिंदे गटही त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.काल तर एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारमध्ये विकासकामांच्या फायली वेगाने सरकत नाहीत,याची जाहीर कबुली दिली.त्यांचा रोख कोणावर होता,हे सांगायला नको.पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थखाते हे अत्यंत नालायक,असे खाते असल्याचा आरोप केला होता,त्यानंतर फडणवीस यांनीही अशाप्रकारचे वक्तव्य करून अजित पवार यांना वागण्यात सुधारणा करा,असा मेसेज दिला आहे.त्यामुळे अजित पवार हे सध्या अडचणीत आले आहेत व ते सतत माझ्याकडून अनेक चुका झाल्याचे सांगत फिरत आहेत.या सर्व घडामोडीवरून ” काका हा काकाच असतो,” असेच म्हणावे लागेल.

