वादळी वा-यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान,
वसंत भोईर,
वाडा तालुक्यातील अंबाडी परिसरात
काळ दुपारी सुटलेल्या जोरदार वादळीवाऱ्याने दुगाडफाटा या गावातील अनेक शेतकऱ्याच्या राहत्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दहा ते पंधरा मिनिटे सुटलेल्या या वादळवाऱ्याने दुगाड मोहिली मालबिडी परिसरातील घरांवरचे छप्पर,कौले व शेड्स उडाले.त्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ग्रामस्थांनी आपल्या घरावर लावलेले सोनल पॅनल, रस्त्यालगतची झाडे व वीजेचे खांब कोसळले.अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सुदैवाने या वावटळीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे.महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे,अशी मागणी दुगाडवासीयांनी केली आहे.

