दीपक मोहिते,
अर्नाळा येथे पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न,
अर्नाळा बस आगाराला देण्यात आलेल्या नव्या एस.टी.बसेस म्हणजे जनतेसाठी दिलासा असुन ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासाला नवे बळ मिळाले आहे,असे उदगार वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी या बसेसच्या शुभारंभ प्रसंगी काढले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वसईकर प्रवाश्यांतर्फे आभार मानले.
याप्रसंगी त्या आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या,एस.टी.बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक या बसेसने रोज प्रवास करतात.त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित,आरामदायी आणि सोयीचा व्हावा,यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होते.त्याला यश आले व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे अर्नाळा बस आगारासाठी पाच नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आज या पाचही नवीन बसेसची विधिवत पूजा करण्यात आली व त्यांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला.यावेळी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी स्वतः बसमधून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला.या उपक्रमामुळे अर्नाळा व परिसरातील प्रवाशांना निश्चितच मोठा फायदा होणार आहे.
या सोहळ्याला अर्नाळा बस आगार व्यवस्थापक सिद्धेश्वर सूर्यवंशी,ज्योत्स्ना मेहेर, रामदास मेहेर,कल्पेश नाईक, चंद्रकांत मेहेर,सुधीर मेहेर, विजय पाटील,आशा चव्हाण, भरत भोईर,विजय भोईर,रुशल म्हात्रे,युगा वर्तक, छोटू आनंद,राजू ईसाई,मिकी आनंद,अनिल राऊत, श्री. संतोष मांडवी,मयुर नाईक, दिनेश घरत,हेमलता बाळशी,सविता ठाकूर,राजेंद्र म्हात्रे यांच्यासह आगराचे चालक,वाहक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

