सुरेश वैद्य,पालघर
जिल्ह्यामध्ये ” शाळा तेथे दाखला,” महत्वाकांक्षी मोहीम राबवण्यात येणार,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागाकडून जनतेसाठी देण्यात येणाऱ्या सेवा व विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी राज्यातील नागरीकांना माहिती व्हावी. त्याचा योग्य लाभ घेता यावा, यासाठी राज्यात महसूल विभागामार्फत १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ” महसूल सप्ताह,”‘ साजरा करण्यात येणार आहे. तसेच १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
महसूल सप्ताह अंतर्गत ७ दिवसात प्रत्येक दिवशी जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वरुप पुढीलप्रमाणे
१ ऑगस्ट ” महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ,”
” महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ,”
२ ऑगस्ट ” शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबाना सदर अतिक्रमित जमिनीचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम,”
३ ऑगस्ट “पाणंद/शिवारस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे,”
४ ऑगस्ट “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबवणे,”
५ ऑगस्ट ” विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे,”
६ ऑगस्ट ” शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार ( नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे ) निर्णय घेणे,”
७ ऑगस्ट ” M-SAND धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे ( SOP प्रमाणे ) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ,”
या कार्यक्रमाअंतर्गत २०११ च्या पूर्वीपासून शासकीय जमिनीवर असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे,पाणंद / शिवरस्त्यांची मोजणी करुन दुतर्फा वृक्षलागवड करणे,विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड व केवायसी न झाल्यामुळे अप्राप्त अनुदान घरभेटी करुन वाटप करणे, तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत,’ मंडळ निहाय अभियांन राबविण्यात येत असून प्रलंबित असलेले वारस नोंद व इतर फेरफार करण्यात येणार आहेत. पालघर जिल्हायामध्ये महसूल सप्ताह अंतर्गत पालघर जिल्हयाच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या संकल्पनेतून महत्वाकांक्षी अश्या ” शाळा तिथे दाखला,” या मोहीमे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध दाखले शालेय स्तरावर वितरीत करण्याचे नियोजन असून याअंतर्गत एकूण ७१ हजार विद्यार्थ्यांना दाखले वितरीत करण्यात येणार आहेत.तसेच महसूल सप्ताहांच्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी ५९ लाभार्थींना वनपटटयाचे वाटप करण्यात येणार आहे.
या सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांची मोहीम यशस्वी व्हावी,म्हणून कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे मार्गदर्शन केले. तसेच पालघर च्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व सर्व अधिकारी/कर्मचारी यांची बैठक घेऊन योग्य ते नियोजन केले.महसूल सप्ताह मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केले. सदर बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे,उपजिल्हाधिकारी महेश सागर,उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.

