जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे माणुसकीची छत्री,आणि वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न,
जव्हार तालुक्यातील रामनगर कातकरीपाडा या गावाच्या शाळेत यारी दोस्ती फाऊंडेशन पालघरतर्फे माणुसकीची छत्री, शैक्षणिक आणि एक सदस्य एक वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला.
यारी दोस्ती ग्रुप मधील सर्व मित्रांनी निधी जमा करून निस्वार्थ भावनेने गरजूंना मदत करण्याचे ठरवले.या निधीमधून माणुसकीची छत्री म्हणून या पावसाळ्यात पालघर जिल्ह्यातील गरजू व्यक्तीचा शोध घेवून त्यांना छत्री वाटप केले.शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या मुलांना ग्रुपतर्फे बक्षीसे देवून गौरवण्यात आले.त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संरक्षण म्हणून सर्व सदस्यांनी या पावसाळ्यात एक वृक्ष लागवड करून ते पूर्ण वाढवण्याची जवाबदारी घेण्याबाबत संकल्प केला.
तसेच या कार्यक्रमात यारी दोस्ती ग्रुप कडून ज्या सदस्यांनी रुग्णासाठी रक्तदान केले,त्या सदस्यांचा ग्रुपतर्फे त्यांना प्रमाणपत्रे देवून गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी आणि यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

