जव्हार प्रतिनिधी,
मेलबिगारी कामगारांची पदे रद्द केल्यानमुळे रस्त्यांची दुरावस्था,
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ग्रामस्तरावरील यंत्रणेत कार्यरत असलेली ” मेल,” बिगारी कामगारांची पदे रद्द करण्यात आल्यापासून ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.त्याचे थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर,पर्यावरणाच्या समतोल व वाहतूक व्यवस्थेवर होत असल्याचे दिसून आले आहे.
” मेल,” बिगारीमुळे आजवर अनेकांचे जीव वाचले आहेत. यापूर्वी मेलबिगारी कामगार हे रस्त्यावर पडलेले लहानमोठे खड्डे तात्काळ माती टाकून बुजवत असत,त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांची जाणीव होत नसे.मात्र सध्या रस्त्यावर पडलेले खड्डे,महिने उलटूनही जैसे स्थितीत आहेत.परिणामी अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.यापलीकडे मेलबिगारी फक्त खड्डे बुजवणेच,नव्हे तर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पाणी देऊन जगवणे,कोवळ्या रोपांची निगा राखणे,इ.कामे मेलबिगारी करत असत. त्यामुळे आजही आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी उंच झाडे ही त्यांच्याच मेहनतीचे फळ आहे.मेलबिगारीच्या अनुपस्थितीत या झाडांचे रक्षण होत नाही,म्हणून शासनाने रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेवून मेलबिगारी कामगारांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे. मेलबिगारी हे कामगार दिशादर्शक फलक,किलोमीटर दर्शवणारे दगड,वाहतुकीचे नियम दर्शवणारे फलक,गार्ड स्टोन व सीमाचिन्हे यांच्या देखभालीचे कामही मेलबिगारी करत असतात. अनेकठिकाणी फलक अर्धवट अवस्थेत असलेले पाहायला मिळतात,त्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणी भेडसावत आहेत. तसेच दिशादर्शक फलक हे सध्या झाडाझुडपांत लपलेले किंवा पडलेले आहेत,त्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होते व अपघातताचे प्रमाण वाढत आहेत.मेलबिगारी हे केवळ कामगार नव्हते,तर ते रस्त्यांचे खरे राखणदार होते.त्यांची कामगिरी ही ” जमिनीवरील यंत्रणा,” म्हणून ओळखली जात होती. म्हणून मेलबिगारी कामगारांची रद्द करण्याचा रद्द करून त्वरित भरती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने या पदांची आवश्यकता पुन्हा ओळखून मेलबिगारी पदांचे पुनरुस्थापन करणे गरजेचे झाले आहे.ही पुनर्बहाली फक्त रोजगारपुरती मर्यादित न राहताती रस्ते सुरक्षा, पर्यावरण रक्षण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी अपरिहार्य ठरणार आहे.शासनाने या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.अन्यथा रस्त्यांवरील अपघातांची, गैरसोयींची व पर्यावरण हानीची किंमत संपूर्ण समाजाला चुकवावी लागेल, म्हणून मेल बिगारी कामगारांची पदांचा विचार करून पूर्ववत करावी,अशी मागणी होत आहे.

