दीपक मोहिते,
मनसेचा भव्य मोर्चा ; सरकारची अब्रू गेली…
आज मनसेने मीरा-भाईंदर शहरामध्ये मोर्चाचे आयोजन केले होते.पण त्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मनसेच्या सैनिकांचा संताप अनावर झाला व मराठी भाषिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.सकाळी पोलीस व मनसे सैनिक यांच्यात सुमारे दोन तास झटापट झाली.मनसे सैनिक मागे हटण्याचे नाव घेत नव्हते.अखेर सरकारला झुकावे लागले व त्यांनी मोर्चाला परवानगी दिली.
आज पहाटे मनसेचे नेते अविनाश जाधव यांना व त्याच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली.या घटनेनंतर आज सकाळी मराठी भाषिकांचा मीरा रोड परिसरात जनसागर लोटला.सुरुवातीला पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली होती,पण अचानक त्यांनी दिलेली परवानगी रद्द केली.या घडामोडीमुळे पोलीस यंत्रणेवर सरकारचा दबाव असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर मनसेचे अनेक नेते मीरा रोड शहरात दाखल झाले.त्याच सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे माध्यमांसमोर येऊन दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्यामुळे जमावामध्ये संतापाची लाट उसळली.यानिमित्ताने मीरा रोड शहरातील रस्त्यावर मराठी भाषेचा आक्रोश पाहायला मिळाला.मीरा रोडचे शिंदे गटाचे आमदार व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक घटनास्थळी आले होते.पण आंदोलकांचा रुद्रावतार पाहून ते माघारी फिरले.दुपारी अडीचच्या सुमारास मनसेचे संदीप देशपांडे व नितीन सरदेसाई हे ट्रेनने मोर्चाच्या ठिकाणी आले.अखेर हा मोर्चा मीरा रोडच्या दिशेने निघाला.अवघ्या चार दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार दुसऱ्यांदा तोंडावर आपटले.आंदोलकांची धरपकड अनेक महिला व सैनिकांना पोलिसांकडून
मारहाण करण्यात आली.अविनाश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांची जोवर सुटका होत नाही,तोवर मोर्चा सुरूच राहणार,असे नेत्यानी जाहीर केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या सूटकेची प्रक्रिया लगबगीने सुरू केली.या मोर्चाचे स्वरूप विशाल असे होते,आंदोलकांना रोखण्याकामी पोलीस यंत्रणा अक्षरशः हतबल झाल्याचे पावलोपावली पाहायला मिळाले.या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस ज्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते,त्यामुळे आंदोलक अत्यंत संतप्त झाले होते.पण आंदोलकाच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्या सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली.

