वसंत भोईर,
वाडा येथे आषाढीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या पालख्या व दिंड्या,
वाडा शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शनिवारी टाळ – मृदुंगाचा गजर करत पालखी व दिंडीचे सोहळे आयोजित केले होते.
वाडा शहरात व ग्रामीण भागात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.वारकरी संप्रदाय,महाराष्ट्राची संतपरंपरा,महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख मुलांना लहान वयातच व्हावी,या हेतूने शाळेतर्फे दरवर्षी आषाढी एकादशीला दरवर्षी हा उपक्रम साजरा करण्यात येत असतो .
तालुक्यातील मौजे खानिवली येथील संगिता पाटील या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खानिवली गावातून पायी दिंडी आयोजित केली होती.या पायी दिंडीतील विठ्ठल – रुखमाई यांचा पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
काही शाळांनी आयोजित केलेल्या या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. ” पाणी वाचवा, झाडे लावा,” आदी पर्यावरण विषयक संदेश देण्यात आले.

