सुरेश काटे,तलासरी
तलासरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत,
मे महिन्यात वीज पडून तलासरी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्याचे दोन बैल मृत्यूमुखी पडले होते, तसेच वीज पडून दोघे जण जखमी झाले होते.त्यांना शासना तर्फे मदतीचा धनादेश आ.विनोद निकोले यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक,नायब तहसीलदार मुकणे,ग्राम महसूल अधिकारी दिपक घाटाळ उपस्थित होते.
मे महिन्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.वरवाडा गावातील संपत जाना करमोडा यांच्या दोन बैलांवर वीज पडून ते मृत्युमुखी पडले. त्यांना नुकसानभरपाई रक्कम ६३ हजार ४०० रु.व सुत्रकार या गावातील वीज पडून जखमी झालेल्या मनीषा संदीप वळवी व तिच्या मुलगा आशिष संदीप वळवी यांना रक्कम १० हजार रु. ची आर्थिक मदत म्हणून शासनातर्फे धनादेश देण्यात आला.

