संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान,
विक्रमगड तालुक्यात काल रात्री वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पडलेल्या अवकाळी पावसाने
अनेक घरांचे प्रचंड नुकसान केले.तसेच आंबा व काजू पिकांचीही मोठ्याप्रमाणात हानी झाली आहे.
गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात विजेचा पत्ता नाही.
विक्रमगड तालुक्यात काल रात्रीपासुन वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन अनेक घरावरील शेडस व पञे उडाल्याच्या घटना घडल्या. अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे काल रात्रीपासुन तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
रस्ते व विजेच्या तारांवर पडलेली झाडे काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर करण्यात येत आहे.
विक्रमगड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी होत असुन जनजीवन पार विस्कळित झाले आहे.काल झालेल्या अतिवृष्टीमध्ये यशवंतनगर येथील सुरेश डंबाळी यांच्या म्हशीला शॉक लागून तीचा मृत्यू झाला आहे.
अवेळी आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकरी व व्यापाऱ्यांचेही नुकसान केले आहे.आपत्ती व्यवस्थापन कक्ष विक्रमगडकडुन मिळालेल्या माहितीनुसार विक्रमगड तालुक्यात ९२ घरांचे नुकसान झाले आहे.तालुक्यात
वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू असुन नागरिकांनी सावधानता बाळगावे,असे आवाहन स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
.

