सचिन परब,विरार
विरार येथील शोभयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
श्री विठ्ठलनाथ संस्थान विरार, आयोजित नववर्ष स्वागत यात्रा,हे आजच्या गुढीपाडवा सणाचे विशेष आकर्षण ठरले. दुपारी चारच्या सुमारास कलावती आई मंदिर येथून या शोभयात्रेला प्रारंभ झाला.त्यावेळी जोरदार जल्लोष झाला.यानिमित्ताने संपूर्ण विरार शहर भगवामय झाले होते.
या शोभायात्रेत तरुण तरुणी,विद्यार्थी,महिला व लहान मुले सहभागी झाले होते.तसेच माजी आ.क्षितिज ठाकुर,माजी नगरसेवक पंकज ठाकूर,अजीव पाटील,ऍड. नयन शहा व हार्दिक राऊत याप्रसंगी उपस्थित होते.या उपक्रमादरम्यान पारंपारिक वेशभूषा,पौराणिक चरित्र वेशभूषा व रील्स स्पर्धा पार पडल्या.शोभायात्रेत तरुण -, तरुणीनी अनेक प्रात्यक्षिके सादर केली.सुमारे दोन तास चाललेल्या या शोभयात्रेची अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत होते. सालाबादप्रमाणे यंदाही शोभयात्रेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

