अनंत भोईर,पालघर
” धरणे-सत्याग्रह,” आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद,
राज्य सरकारी,निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” धरणे-सत्याग्रह,” आंदोलन करण्यात आले.सकाळी ११.०० ते दु.१.०० या दरम्यान झालेल्या या आंदोलनाला कर्मचारी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत आणि महत्त्वाच्या मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात राज्य गट ड व जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना सक्रिय सहभागी झाली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव किशोर प्रल्हाद पाटील,जिल्हाध्यक्ष कल्पेश कोशिंबे,उपाध्यक्ष राजेंद्र वरठा,महिला संघटक सीमा चौधर,सचिव हर्षद निकुळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
तसेच समन्वय समितीचे निमंत्रक डी.डी.पाटील, आरोग्य सेवक संघटनेचे अध्यक्ष बालाजी सातपुते, ठाणे-पालघर शिक्षक माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान आणि विविध कर्मचारी संघटनांचे सदस्यही आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलन शांततेत पार पडले असून पुढील टप्प्यात याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची कर्मचारी वर्गाला अपेक्षा आहे.

