नाशिक विशेष प्रतिनिधी,
फसवणूक केल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावास व ५० हजार रु.दंड,
१९९५ ते ९७ च्या दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात,त्या सदनिका घेतल्या होत्या.त्यावेळेस त्यांनी आमचं उत्पन्न हे कमी आहे, आणि आमचे दुसरं घर नाही.अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली होती.त्या सदनिका त्यांना शासनाच्या १० % कोट्यातून मिळाल्या होत्या.मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केली होती.१९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा होता आरोप माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही केला होता.याचिका दाखल केली होती,याबाबत नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.हे प्रकरण १९९७ पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
यामध्ये एकूण चार आरोपी होते.त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता.मात्र इतर दोन जणांच्या बाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाची शिक्षेची तरतूद केली नाही.माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना मात्र दोन वर्षाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा ठोठावली.माणिकराव कोकाटे यांंच्यावर कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.या आरोपांनुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते.त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहेत.धनंजय मुंडेंनंतर माणिकराव कोकाटे यांच्यामुळे अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्या नेत्याच्या मंत्रिपदावर संकट ओढावलं आहे.त्यामुळे आता याप्रकरणात माणिकराव कोकाटे,अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

