शुभम सावंत,विरार
वसई – विरार मनपा क्षेत्रातील बेवारस वाहनांवर कारवाई होणार,
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दूतर्फा शेकडो बेवारस वाहने धूळ खात पडून असल्याचे दिसून आले आहे.अशा बेवारस वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो व रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असते.परिणामी त्याचा त्रास वाहनांमधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो.तसेच सदर बेवारस वाहने एकाच जागी अनेक दिवसापासून पडून राहील्यामुळे त्यावर धुळ साचते व या धुळीचा नागरिकांना त्रास होत असतो. या वाहनांच्या आजुबाजुच्या परिसरात रस्ता सफाई कर्मचाऱ्यांना रस्त्याची साफसफाई करताना अडचणींचा सामना करावा लागतो.कचरा साचुन वातावरणात दुर्गंधी पसरते.या सर्व बाबींचा विचार करुन महानगरपालिकेचे आयुक्तानी या बेवारस वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

” महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २३० व २३१ अन्वये,” सदर वाहनांवर कडक कारवाई करणेत येणार आहे.याकामी सर्व प्रभाग समिती क्षेत्रातील बेवारस वाहनांचे प्रभाग निहाय सर्व्हेक्षण करण्यात आले असुन प्रभाग समिती ‘ए’ ते ‘आय’ या क्षेत्रात अंदाजे ४४३ बेवारस वाहने असुन सदर वाहनांवर १२ फेब्रु.२०२५ पासुन कारवाई करणेत येणार आहे.
सदर कारवाई टाळण्यासाठी ज्या नागरिकांनी आपली वाहने सार्वजनिक रस्त्यावर बेवारस अवस्थेत ठेवली असतील तर त्यांनी ती १० फेब्रु. २०२५ पर्यंत हटवावीत.अन्यथा अशा बेवारस वाहनांवर कारवाई करणेत येणार आहे.याची नोंद घ्यावी,असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहॆ.

