अनंत नगरकर,बोईसर,
पालघर येथे भाजपचे संगठनपर्व संपन्न,सदस्य नोंदणीला प्रचंड वेग,
भारतीय जनता पार्टीच्या पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक आज पालघर येथे पार पडली.भाजपने राज्यात संघटनपर्व या उपक्रमाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी मोहिमेला चांगलाच वेग दिला आहॆ.
संघटनपर्व अंतर्गत राज्यभरातून दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.या अनुषंगाने भाजपा परिवारातील प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन संपर्क करण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पालघर येथे झालेल्या संघटन पर्व कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.
या बैठकीला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आ.हरिश्चंद्र भोये,भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत,प्रदेश सचिव राणीताई द्विवेदी,भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव सुरेखाताई येवले,पालघर जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी कोठाळे,माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील,सरचिटणीस सुशील औसरकर,जि.प.उपाध्यक्ष पंकज कोरे,संदीप पावडे, वीणाताई देशमुख,युवा मोर्चाचे निखिल चव्हाण आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

