सुरेश काटे,तलासरी,
चांगले चारित्र्य हा श्वास तर अखंड भारत,हाच आपला धर्म, – सतीश भिडे,
भारत देश गतिमान, बलवान,सामर्थ्यवान बनवायचा असेल तर विद्यार्थ्यांनी उत्तम चारित्र्य हाच श्वास व अखंड भारत हाच आपला ध्यास मनोमनी जपावा,असे कळकळीचे आवाहन स्वातंत्रवीर वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे यांनी तलासरी तालुक्यातील कवडा येथे आयोजित कार्यक्रमात केले.
तलासरी कवाडा ठाकरपाडा येथे जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरच्या ३ हजार १५२ व्या कार्यक्रमास सरपंच दर्शनाताई बोदले व मुख्याध्यापक अशोक धोडी तसेच हजारो विद्यार्थी व गुरुजन मंडळींचे उपस्थितीत सादर करतेवेळी सतीश भिडे यांनी भारत देश जगातली महासत्ता होण्यासाठी केवळ मंत्र नव्हे तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे,असे सांगून अब्दुल कलाम,लालबहादूर शास्त्री,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वा.वीर सावरकरांची चरित्रे पाठ्य पुस्तकात अनिवार्य व्हायलाच हवीत,असे सांगितले.

