शुभम सावंत,विरार,
उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात ” वंदे मातरम,” चे समूहगायन
भारतमातेला वंदन करणारे राष्ट्रीय गीत ” वंदेमातरम, ” १५० वर्षांपूर्वी कार्तिक शुद्ध नवमीला लिहिले गेले.ही तिथी कुष्माण्डा नवमी,या नावेही ओळखली जाते.या तिथीला देवीने जसा कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध केला आणि देवतांना अभय दिले, त्याचप्रमाणे आपली भारत भूमी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली.म्हणून तत्कालीन प्रख्यात कादंबरीकार आणि कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे राष्ट्रीय गीत लिहिले. बालपणापासून आपण त्याचे एकच कडवं म्हणत आलो आहोत.मात्र चॅटर्जी यांनी त्याच काव्यात मातृभूमीच्या स्तुतीपर आणखी चार कडवी लिहिली आहेत.त्या शब्दांचा परिचय करून घेण्यासाठी सामूहिक गीत गायन करून मातृभूमीला वंदन करण्याचा विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात स्तुत्य उपक्रम केला.
वंदेमातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले होते जे त्यांच्या आनंद मठ ( १८८२ ) या सर्वात प्रसिद्ध कादंबरीचा एक भाग होता जो संन्यासी बंडाच्या घटनांवर आधारित असून हे गीत बंगाली भाषेत आहे.वंदेमातरम हे गीत सर्वप्रथम रविद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये गायले होते.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी २४ जाने.१९५० रोजी संविधान सभेत घोषणा केली की,भारतातील ऐतिहासिक स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या वंदे मातरम,या गीताचा गौरव करण्यात यावा.जन,गण,मन बरोबर समानतेने आणि त्याला समान दर्जा दिला पाहिजे.
यानिमित्ताने २४ जाने.२०२५ रोजी महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या सुमारे ४ हजार ५०० विद्यार्थी आणि २५० हुन अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नवीन विवा महाविद्यालयाच्या प्रांगणात वंदे मातरम् गीताचे प्रा.पद्मजा अभ्यंकर यांच्यासोबत सामूहिक गायन केले.यावेळी सर्व विभागप्रमुख व विवा महाविद्यालयाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

