नदीम शेख,पालघर,
जनतेच्या कामाना सर्वोच्च प्राधान्य द्या – पालक सचिव डॉ.सोनिया सेठी,
शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात.शासकीय अधिकार आणि कर्मचारी यांनी जनतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,
असे निर्देश पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव ( मदत व पुनर्वसन ) डॉ.सोनिया सेठी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात श्रीमती डॉ.सेठी यांनी आढावा बैठक घेतली.बैठकीला जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,उपजिल्हाधिकारी विजया जाधव,महेश सागर , तुषार माळी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आढावा घेतल्यानंतर पालक सचिव श्रीमती डॉ.सेठी म्हणाल्या,सर्वांनी चांगले सादरीकरण केले आहे.जिल्हा प्रशासनाची टीम चांगलं काम करत आहे.त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या कृती आराखड्याचा गुड गव्हर्नन्साठी प्राधान्याने अंमलबजावणी करावी. सर्वसामान्य जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. सकारात्मतक विचार करुन कार्यालयात येणाऱ्या जनतेची कामे प्राधान्याने करावी, कार्यालयातील वातावरण आनंदी,प्रसन्न असले पाहिजे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके,पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच विविध विभागप्रमुखांनी ७ कलमी कृती कार्यक्रमावर आधारित १०० दिवस कृती आराखडा याविषयी संगणकीय सादरीकरण केले.
आढावा बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी गणेश बोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन पालक सचिव श्रीमती डॉ.सेठी यांचे स्वागत केले.

