दीपक मोहिते,
नालासोपारा येथे उर्वरित ३६ अनधिकृत इमारतीवरील तोडक कारवाई सुरु,
नालासोपारा पूर्वेस आरक्षित असलेल्या शासकीय जमिनीवर बांधण्यात आलेल्या ३६ अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ इमारती वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने जमिनदोस्त केल्या होत्या.पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली.आजपासून उर्वरित ३६ इमारतीवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विविध विकाकामासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर समाजकंटकांनी थेट ४१ अनधिकृत इमारती बांधल्या व त्यामधील सदनिका गोरगरीब कुटुंबाना विकल्या.या जमिनीचा मूळ मालक व महानगरपालिका या दोघांमध्ये वाद होता,त्यामुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.मात्र जमिनीवर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने सर्वप्रथम ही अनधिकृत बांधकामे त्वरित निष्कासित करण्यात यावीत, असे निर्देश दिले.त्यानुसार महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने विधानसभा निवडणुकीपूर्वी ६ इमारती निष्कसित करण्यात आल्या.त्यानंतर आता उर्वरित ३५ इमारती करण्यासाठी महानगरपालिका पुन्हा सज्ज झाली आहे.
या तोडक कारवाई दरम्यान पीडित कुटुंबियांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने व पोलीस यंत्रणेने प्रचंड फौजफाटा तैनात केला आहॆ.या परिसरात तणावाचे वातावरण असले तरी ती नियंत्रणात असल्याचे मनपा सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान आपल्या डोळ्यासमोर आपली घरे उध्वस्त पाहताना अनेक लोकांचे डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. निवडणुकीपूर्वी नवनिर्वाचित खासदार व आमदारांनी त्यांची घरे वाचवण्याबाबत तोंडभरून आश्वासने देणाऱ्या आमदाराची लोकांच्या रोषाला तोंड देताना अक्षरशः बोबडी वळली होती. लोकांचा संताप अनावर होत असल्याचे पाहून त्यांनी आपल्या वाहनातून पळ काढला.

