सचिन परब,विरार
व.पं.समितीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण,
वसई तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांना शेतीनिष्ठ व शेतीपूरक व्यवसायात अधिकची माहिती व्हावी,म्हणून वसई पंचायत समितीच्या कृषी आणि पशु विभागातर्फे विरार पूर्व भागातील पारोळ येथे दोन दिवसीय शेतकरी मेळावा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,
आज मेळाव्याचा दुसरा दिवस आहॆ.या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना व पशुपालकांना आधुनिक शेती पद्धत व पाळीव जनावरांचे आधुनिक यशस्वी संगोपन,पिकांवर कोणते प्रक्रिया उद्योग करता येतात,दूध उत्पादनात वाढीसाठी प्रयत्न,दुग्धजन्य पदार्थ व त्यापासून इतर पदार्थ प्रक्रिया,तसेच शेती पूरक व्यवसाय,कुक्कुटपालन , शेळीपालन याविषयी शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहॆ.यावेळी विषमुक्त सेंद्रिय शेतीने समाजाचे हित कसा साधू शकतो,याबाबत माहिती प्रशिक्षण आणि चर्चा करण्यात आली.वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याच्या उदघाट्नप्रसंगी पालघर जि.प. सदस्य कृष्ण माळी,सदस्या आशा चव्हाण,पं.स.सदस्या गीता पाटील,शुभांगी बेंद्रे ,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश हसनाळकर ,
कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी ,
प्रादेशिक सहा.आयुक्त मुंबई डॉक्टर प्रशांत कांबळे ,
डॉ.नकुल कोरडे सहायुक्त पशुसंवर्धन वसई,
आदित्य राऊळ कृषी अधिकारी पंचायत समिती वसई,आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन घनश्याम पाटील विस्तार अधिकारी कृषी यांनी केले.

