सुरेश काटे,तलासरी,
तलासरीत शेअर रिक्षांचांच प्रवाश्यांना आधार,
तलासरीसारख्या आदिवासी भागात अपूरी एसटी सेवा,तसेच वाहतुकीच्या साधनांचा अभाव,यामुळे तलासरी भागात प्रवासासाठी रिक्षांचा प्रवास लोकांनां करावा लागतो.खेडेगावात स्वतंत्र रिक्षा भाडे लोकांना परवडत नसल्याने प्रत्येक गावपाड्यात शेअर रिक्षाने लोकांना प्रवास करावा लागतो.
खराब रस्ते आणि दुरवरचा प्रवास,यामुळे प्रत्येक रीक्षात आठ ते दहा प्रवासी भरल्या शिवाय रिक्षा प्रवासाला सुरुवात होत नाही.तालुक्यात वाहतुकीची साधने अपुरी असल्याने नाईलाजास्तव रिक्षा मधून जीवघेणा प्रवास करावा लागतो,
तलासरी भागात मोठ्या प्रमाणात खाजगी रिक्षा आणि गुजरात पासिंग रिक्षा आहेत. या भागांतील कामगार मोठ्या संख्येने गुजरात राज्यात कामाला जात असतो,पण वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने त्याना शेअर रीक्षांचा वापर करावा लागतो,या रिक्षापैकी अनेक रिक्षा,या अनधिकृत,विना पासींग,विना इन्शुरन्स चालतात,मीटर रिक्षाला दिसणे दुर्मिळ,पण पोलिसांना या गैरप्रकाराकडे कानाडोळा करावा लागतो.
वाहतुकीची अपुरी साधने, वेळेत प्रवासी न मिळणे,यामुळे कधी कधी लोकांनी दोन ते तीन कि.मी.पायी चालत मुख्य मार्गावर यावे लागते,यात लोकांचा वेळ आणि पैसा खर्च होत असतो.तरुणाच्या हाताला काम नसल्याने अनेक तरुणानी बँक कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत.मोठ्या प्रमाणात रीक्षा असल्याने प्रवासी भाडे मिळत नाही.खराब रस्ते,यामुळे रिक्षा चालवणेही तरुणांना परवडत नाही.त्यातच पोलिसांनी कारवाई केल्यास तरुणाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असतो.यामुळे मीटर न वापरता शेअर रिक्षा चालवणाऱ्या वर कारवाई करणे पोलिसांना नाईलाजास्तव टाळावे लागते.

