- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सारं काही विस्मयजनकच दोन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गणपतीच्या निमित्ताने गेले होते.या घटनेमुळे देशभरात प्रचंड गदारोळ उठला.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आमंत्रण दिले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ” बिन बुलाये मेहमान,” त्यांच्याकडे गेले होते,हे यथावकाश कळेलच.आपले पंतप्रधान असेच एकदा पाकिस्तानचे नवाज शरीफ यांच्या घरी पोहोचले होते.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना आमंत्रण दिले होते की मोदी स्वतःहुन आले,हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याविषयी खुलासा करणे आवश्यक ठरते.त्यांच्या या भेटीवर घटनातज्ञ तसेच कायदेतज्ञानी आक्षेप घेतले आहेत.घटनातज्ञ बापट यांनी या दोघांची भेट,ही न्यायव्यवस्थेच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे असे स्पष्ट करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यांच्याकडे असलेल्या…
पालघर, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २२ लाख १९ हजार ३३ मतदार, लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात सुमारे २२ लाख १९ हजार ३३ मतदार आपल्या हक्काचे ६ आमदार निवडणार आहेत.या एकूण मतदारांपैकी ११ लाख ५६ हजार ९९९ पुरुष तर १० लाख ६१ हजार ८०८ महिला मतदार असून इतर मतदारांची संख्या २२६ इतकी आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात १२८-डहाणू,१२९-विक्रमगड,१३०-पालघर,१३१-बोईसर,१३२-नालासोपारा व १३३- वसई,असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी १३१-नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ८२ हजार ९०२ मतदार आहेत.त्यापैकी पुरुष-३ लाख १५ हजार ८२९ तर २ लाख ६६ हजार ९५३ महिला मतदार आहेत.येथे इतर मतदारांची संख्या अधिक आहे.१२० इतर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्वतःला देव समजू नका – सरसंघचालक मोहन भागवत, लोकसभा निवडणुकीनंतर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,या दोघांमध्ये असलेली दरी अधिक रुंदावत चालली आहे.गेल्या आठवड्यात संघाच्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले होते.या पूर्वी संघाचे मुखपत्र असलेल्या ” ऑब्झरर्व्हर,” मध्ये ” भाजपने केलेल्या चुकांमुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला,” असा लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्यानंतर वादाला तोंड फुटले आहे.चार दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी कोणीही स्वतःला देव समजू नये,असे आपल्या भाषणात सांगितले.त्यांचा रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने होता,हे काही लपून राहिलेले नाही. भाजप हा राजकीय पक्ष…
दीपक मोहिते, अनंत चतुर्दशीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा, गेल्या दोन महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.सध्या पाऊस ओसरल्यामुळे प्रशासन रस्त्याची दुरुस्ती व डागडुजीची कामे हाती घ्यावीत,अशी मागणी करण्यात येत आहे.पण वसई-विरार मनपाचे बांधकाम विभाग सध्या मरणासन्न अवस्थेत आहे.त्यामुळे खड्डे पडलेल्या रस्त्यावरून गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेताना गणेशभक्तांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.निदान अनंत चतुर्दशीपूर्वी तरी रस्त्यांची दुरुस्ती व्हावी,अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.तसेच या रस्त्यावरून सध्या प्रवासी वाहने चालवणे धोकादायक ठरले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे शहराच्या पूर्वेस असलेल्या अनेक रस्त्याची पार चाळण झाली आहे.या रस्त्यावरून पादचाऱ्यांना येजा करणे,अशक्य झाले आहे.वसई विरार शहर…
दीपक मोहिते, शाळेचे आरक्षण असलेल्या जमिनीवर अनधिकृत चाळीचे साम्राज्य, राज्य सरकार एकीकडे आमची शाळा,सुंदर शाळा योजना राबवत असताना दुसरीकडे वसई- विरार शहर महानगरपालिका हद्दीत शाळांसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर मात्र अनधिकृत चाळीचे पीक आले आहे.सध्या या आरक्षित जमिनी चाळ माफियांच्या घशात गेल्या आहेत. तर खाजगी जमिनीवर धनदांडग्या शिक्षण माफियांनी अनधिकृत शाळा उभारल्या आहेत.महानगरपालिका व वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे वसई तालुक्यात शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.या ज्वलंत प्रश्नी शिक्षण विभाग,पालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. भूमाफिया,चाळमाफिया व शिक्षणमाफिया,शिक्षण विभाग व महानगरपालिका प्रशासन,यांच्या संगनमताने अनेक आरक्षित जमिनींचा फडशा पाडण्यात आला आहे. वसई -विरार शहर महापालिकेच्या हद्दीत काही आरक्षित भूखंडावर शाळांसाठी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” “भगव्याने गुलाबी रंग झाकण्यासाठी घेतला काळ्या रंगाचा आधार, बारामतीमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.घटना होती,कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कमानीवर असलेला अजित पवार यांचा फोटो काळ्या पडद्याने झाकुन टाकला.या घटनेने अजित पवार गटाचे तमाम नेते व प्रवक्त्यांचे पित्त चांगलेच खवळले व ते सारे कार्यक्रमाच्या या आयोजकांवर तुटून पडले.बारामतीसारख्या मतदारसंघात असं घडावं,हे अजित पवार यांना त्रासदायक ठरणारे आहे.दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाने बारामती येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे आमंत्रण अजित पवार यांना देण्यात आले होते.तसेच त्यांनी कार्यक्रमास यावे,यासाठी आयोजकांनी त्यांना वेळोवेळी विनंत्या केल्या,तसेच मोबाईलवरून कॉल देखील केले,पण अजित पवार हे काही कार्यक्रमास उपस्थित…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नागपूर हिट अँड रन ; महायुतीला परिणाम भोगावे लागणार, राज्यात महायुती सरकारला गेल्या तीन महिन्यापासून एकामागून एक असे अपशकुन होत आहेत.पुणे व वरळी येथे हिट अँड रन,बदलापूर बलात्कार,मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे आणि आता नागपूर येथे हिट अँड रनची घडलेली ताजी घटना.या सर्व घटना महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणाऱ्या आहेत. या प्रत्येक घटनेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महायुतीच्या घटक पक्षांचा संबध आला आहे.पुणे येथे घडलेल्या हिट अँड रन घटनेतील आरोपी हा अजित पवार गटाशी संबधित आहे,या गटाचा एक आमदार आरोपीच्या संदर्भात पोलिसांनी सौम्य भूमिका घ्यावी,असे सांगण्यासाठी मध्यरात्री पोलीस ठाण्यात गेला होता.त्यानंतर वरळी मुंबई येथे घडलेल्या घटनेत…
दीपक मोहिते, ” निवडणूक पूर्व विश्लेषण,” ….अन्यथा मातोश्रीवर कायम निवांत व्हावे लागेल, देशात निवडणूक पूर्व सर्व्हेक्षण करणाऱ्या एका अग्रगण्य संस्थेचा सर्व्हे नुकताच जाहीर झाला आहे.या संस्थेने आजवर केलेल्या एकूण सर्व्हेपैकी ९० % सर्व्हे खरे ठरले आहेत.पंजाब,कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश,राजस्थान व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक सर्व्हेचा त्यामध्ये समावेश आहे,हे आपण लक्षात घ्यायला हवे.आपल्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसणार आहे,असे त्यांचा सर्व्हे सांगतो.त्यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीला १५५ ते १६० तर महायुतीला ११५ ते १२० जागा मिळणार आहेत.कोकण-३९ व मुंबई-३६ अशा कोकण विभागातील ७५ जागा वगळता इतर ४ विभागात ( विदर्भ -६२,उ.महाराष्ट्र-४७,प.महाराष्ट्र-५८ व मराठवाडा-४६, ) महायुतीची पीछेहाट होईल,असा अंदाज त्यांनी व्यक्त…
दीपक मोहिते, जातीपातीचे राजकारण, नालासोपारा विधानसभा ; बाहेरचा उमेदवार लादल्यास भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होणार, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंधात भाजपचा उमेदवार कोण ? या चर्चेला सध्या ऊत आला असून भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहेत.अशावेळी भाजप मात्र या विधानसभा मतदारसंघात हिंदी भाषिकांची लोकसंख्या लक्षात घेऊन उत्तर भारतीय उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे.डहाणूचे विद्यमान नगराध्यक्ष भरत राजपूत व भाजपच्या स्थानिक पदाधिकारी ऍड.नेहा सुरेश दुबे या दोघांची नांवे चर्चेत आघाडीवर आहेत.डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांची राजकीय पार्श्वभूमी ही वादग्रस्त असून एका बँक घोटाळ्याप्रकरणी ते अडचणीत आले होते.तसेच त्यांचा राजकीय प्रवास हा देखील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय…
दीपक मोहिते, ” निवडणूक विशेष,” जागावाटपात भाजपच ” मोठा भाऊ,” गृहमंत्री अमित शहा हे सालाबादप्रमाणे, ” लालबागच्या राजा,” च्या दर्शनासाठी काल मुंबईत आले होते.या दौऱ्यात त्यांनी गणेश दर्शन व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप,असा दुहेरी कार्यक्रम आखला होता.त्यांनी विमानतळावर फडणवीस,शिंदे व अजित पवार या त्रिकुटाला चर्चेसाठी पाचारण केले होते.यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर या तिघांचे चांगलेच कान टोचले.त्यांनी महायुती ही अभेद्य राहिली पाहिजे,असा सज्जड दम या तिघांना दिला.तसेच महायुतीची भूमिका माध्यमासमोर मांडण्यासाठी केवळ तीन प्रवक्ते नियुक्त करा,अशी सूचना केली.त्यामुळे सध्या प्रवक्त्याची जी खोगीरभरती झाली आहे,ती निश्चितच कमी होणार आहे.महायुतीमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत वादावरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत…
