दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्यात सरकार असून नसल्यासारखे,
जातीपाती व धर्माचे राजकरण करणाऱ्या महायुतीच्या नेत्याना त्याच्या या दळभद्री राजकारणाने आता चांगलेच अडचणीत आणले आहे.मराठा विरुद्ध ओबीसी व आदिवासी विरुद्ध धनगर,या समाजामध्ये भिंती उभारण्याचे काम,ज्या नेत्यानी केले त्यांना लोकसभा निवडणुकीत विशिष्ट समाजाने चांगलाच हिसका दाखवला होता.त्या दणक्यानंतर तरी हे दळभद्री राजकारणी आपल्या वागण्यात सुधारणा करतील,अशी अपेक्षा होती.पण अंतरवली सिराट व वडगोद्री या गावात तसेच धारावी मुंबई येथे जे काही चालले आहे,ते दंगलीना आमंत्रण
देण्यासारखे आहे.राज्याचे गृहमंत्री विविध वृत्तवाहिनीवर केवळ फुकटचे सल्ले देत असताना पाहायला मिळतात.वास्तविक रस्ते बंद करणे,दगडफेक करणे,असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.पण गृहखात्याने त्यांना तमाशाई बनवून ठेवले आहे.धनगर समाजाने देखील आंदोलन छेडल्यामुळे राज्यातील आदिवासी संघटना आता धनगर समाजविरोधात एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत.काल बोईसर पूर्व भागात चिल्हार फाटा येथे या संघटनांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.समाजात तेढ निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत
आहेत.त्याला सरकारने वेळीच आवर घातला नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.कोण गुलाबी जॅकेट्स घालून मतांचा जोगवा मागत फिरत आहेत.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इव्हेंट्स करण्यात मश्गुल आहेत.तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री हे केवळ बघ्याची भूमिका घेत फुकटचे सल्ले देत फिरत आहेत.राज्याची प्रशासकीय यंत्रणा पार कोलमडली असून कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या लोकांनी कितीही पैश्याची खिरापत वाटली तरी मतदार या निवडणुकीत त्यांना नक्कीच बाय बाय करणार आहेत.
Trending
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
- ममता बॅनर्जी यांचा उद्धव ठाकरे होणार…
- अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली,
- वेळीच सावध व्हा, अन्यथा विनाश अटळ,
- अन्यायाविरोधात तरुणांनी पेटून उठायला हवे,
- चबाहर बंदर व टॅरिफ ; भारताचे परराष्ट्र धोरण चांगलेच अंगलट,
- रविंद्र फाटक यांना वसईत पैकीच्या पैकी मतदान होऊ शकते ,
