Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपला जळीस्थळी शरद पवारच दिसतात, काल गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले होते.तर शरद पवार यांनीही आपले जावई व नातीसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.शरद पवार यांनी गणपतीचे दर्शन घेतल्यामुळे भाजप नेत्यांचा आता पोटशूळ उठला आहे.पक्षाचा प्रवक्ता कसा असू नये,याचे प्रतिक असलेले प्रविण दरेकर सध्या या विषयावर अकलेचे तारे तोडत आहेत.ते म्हणतात,शरद पवार यांचे गणपती दर्शन हे नौटंकी आहे,घसा फोडून ओरडत आहेत,शरद पवार यांचे गणेश दर्शन ही जर नौटंकी असेल तर मग गृहमंत्री अमित शहा यांचे गणपती दर्शन,हा तमाशा समजायचा का ? शरद पवार यांना हिंदुत्व विरोधी ठरवण्यासाठी भाजप कायम आगपाखड करत आला…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर, तरच म.गांधींचे ” खेड्यातील भारत,” स्वप्न साकार होईल, ग्रामीण भागातील शासनव्यवस्था अधिक प्रभावी,बळकट करणे व लोकांचा विकसकामात थेट सहभाग,असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य सरकारानी चार दशकापूर्वी अनेक समित्या नेमल्या.त्यापैकी एल.एम.सिंघवी समितीने पंचायतराज संस्थांना घटनात्मक मंजुरी व संरक्षण द्यावे,अशी महत्वपूर्ण सूचना केली व ती तत्कालीन सरकारने स्विकारली.त्यानंतर सरकारकडून ७३ वी घटनादुरुस्ती करण्यात आली.ही घटना दुरुस्ती करण्यामागे सिंघवी समितीच्या अहवालाचे मोठे योगदान होते. १९९२ मध्ये ७३ व्या घटना दुरुस्तीने बदल करण्यात आले.पंचायतराज आता शासन प्रणाली म्हणून काम करत आहे.या व्यवस्थेमुळे महात्मा गांधींनी ग्रामस्वराज्याचे जे स्वप्न पाहिले होते,ते एकप्रकारे प्रत्यक्षात उतरले.खेड्यापाड्यात विखुरलेल्या आपल्या देशाला विकेंद्रित शासनाची गरज…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” काका हा काकाच असतो,” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक मी बारामतीमधून लढवू इच्छित नाही,असे जाहीर केले आहे.आपल्या पत्नीचा लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव,पत्नी व दोन मुले वगळता संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या विरोधात जाणे,आपल्या काकांचा पक्ष,आमदार पळवणे,इ.बाबी बारामतीकरांच्या मनाला पटल्या नाहीत.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जबर फटका बसला होता.त्यामुळे अजित पवार हे वारंवार नाझ्याकडून अनेक चूका झाल्याचे सांगत फिरत आहेत.विधानसभा निवडणुकीतही आपला पराभव होईल,अशा भितीमुळे अजित पवार आता चांगलेच नरमले आहेत.महायुतीमधील एकनाथ शिंदे गटही त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.काल तर एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारमध्ये विकासकामांच्या फायली वेगाने सरकत…

Read More

दीपक मोहिते, निवडणुकीचे वारे, आ.ठाकूर रिंगणात नसतील तर माजी महापौर प्रविणा ठाकूर यांना उमेदवारी मिळावी, पालघर जिल्ह्यातील सहापैकी तीन विधानसभा जागा,आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे आहेत.तर उर्वरित पालघर-एकनाथ शिंदे गट,विक्रमगड- राष्ट्रवादी काँग्रेस ( उबाठा ) व डहाणू- मार्क्स.कम्यु.या तीन पक्षाकडे आहेत.वसई व नालासोपारा या दोन्ही मतदारसंघात ठाकूर कुटुंबियाशिवाय इतर कोणालाही मतदार स्विकारत नाहीत.त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनीच उभे राहावे,अशी मागणी करण्यात येत आहे.पण हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवायची नाही,अस ठरवलं तर त्यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर यांना उमेदवारी देण्यात यावी,अशी मागणी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करत आहेत.यामध्ये व्यापारी,उद्योजक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक,नोकरदार मंडळी,महिला…

Read More

दीपक मोहिते, अजित पवार यांना झालंय तरी काय ? अजित पवार यांना झालंय तरी काय ? धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ही लवकरच शरद पवार गटात सामील होणार आहे.त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांचा संताप अनावर झाला आहे.आत्राम कुटूंबातील वाद शिगेला पोहोचला असताना अजित पवार यांनी दिलेला सल्ला ऐकून आपण सारे चकितच झालो आहोत.ते आत्राम यांच्या कन्येला सल्ला देताना म्हणाले,राजकारणासाठी स्वतःचे घर फोडू नका,ती चूक मी केली,त्याचे परिणाम मला भोगावे लागत आहे.मी केलेल्या चुकीचा मला प्रचंड पश्चाताप होत आहे.उशिरा का होईना,त्यांना पश्चाताप होतोय,हेही नसे थोडके…. स्वतःचे घर फोडताना,८५ वर्षे वयाच्या आपले वयोवृद्ध काका व ज्या बहिणीने आयुष्यभर आपल्यावर प्रेम केलं,त्या…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” अर्थखाते नालायक आहे,गुलाबराव पाटलांचा अजित पवारांवर घणाघाती हल्ला, राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री यांनी गुलाबराव पाटील यांनी राज्याचे अर्थखाते किती नालायक आहे,यावर दोन दिवसांपूर्वी कडक शब्दात टीका केली होती.त्यांच्या या टिकेनंतर राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले.गुलाबराव यांनी जो संताप व्यक्त केला त्यास ८० % आमदाराकडून पाठिंबा मिळाला आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अर्थखाते व अर्थमंत्र्याबाबत गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो,ते योग्य तेच बोलले असे सांगत त्यांनी आघाडीचे सरकार असतानाही अर्थखात्याने मनमानी कारभार केल्याचा थेट आरोप केला.या दोघांचा रोख अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे होता.अडीच वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर घडून आले तेंव्हा मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यसरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? तीन इंजिनच्या सरकारने ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याची घोषणा केली आहे.या उपक्रमाचा पहिला टप्पा गेल्या जाने.२०२४ मध्ये पार पडला होता.दुसऱ्या टप्प्यास नुकतीच सुरुवात झाली आहे,हा टप्पा १५ सप्टें.पर्यंत सुरू राहणार आहे. ” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा,” या योजनेंतर्गत आपल्या मुख्यमंत्र्यांनी ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” असा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.हा उपक्रम राबवण्यामागे विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करणे,क्रीडाविषयी जनजागृती करणे व शैक्षणिक वाढीला प्रोत्साहन देणे,अशी उद्दिष्टे आहेत.या उपक्रमांतर्गत सरकार ध्येय व धोरण अमलबजावणी-७४ गुण, पायाभूत सुविधा-३३ गुण व शैक्षणिक वाढ -४३ गुण…

Read More

दीपक मोहिते, विश्लेषण, उद्धव ठाकरे यांनी समंजस भूमिका घ्यावी, महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये सध्या जागावाटप व मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण ? यावरून घमासान सुरू झाले आहे.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला शरद पवार यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ” रुसूबाई रुसू आणि कोपऱ्यात जाऊन बसू,” अशी भूमिका स्विकारली आहे.त्यांचे अशाप्रकारचे वागणं आघाडीला त्रासदायक ठरू शकते.तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप याविषयी चकार शब्द काढायला तयार नाही.त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे याविषयी बोलताना,” हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डात होणार असल्याचे सांगत सुटले आहेत.आणि ते खरं देखील आहे,एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडेल,असे सगळ्यांना वाटले होते.दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस…

Read More

दिपक मोहिते, भयानक वास्तव, विकासाच्या नावाखाली सुरू असलेला नंगानाच थांबवा, गेल्या महिन्याभरात राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होऊन कृषिक्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून पडले आहे.या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन किंवा पीक विमा योजनेचा फायदा देऊनही तो पुन्हा उभा राहील,अशी स्थिती नाही.वर्षानुवर्षे हे असे चालत आले आहे.कर्जमाफी,नुकसान भरपाई व पीक विमा इ.उपाययोजना या तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत.निसर्गाचे ऋतुचक्र का बिघडले आहे,याच्या खोलात जाऊन कारणे शोधण्याची गरज आहे.सरकार त्यादृष्टीने पावले उचलत नाही.त्यामुळे राज्यातील कृषिक्षेत्र लयाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जस जसे आपण एकविसाव्या शतकाकडे जाऊ लागलो तसे काळाच्या ओघात आपण खुप काही गमावत चाललो आहोत.वृक्षांची…

Read More

दीपक मोहिते, गडकरी यांचे आगमन ; देवेंद्र फडणवीस यांची पीछेहाट सुरू, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी याना पाचारण केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्यास सुरुवात झाली आहे.राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय नेत्यानी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव हा केंद्रीय नेतृत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.लोकसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आखलेले डावपेच अंगाशी आल्यानंतर दिल्लीत त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महायुतीच्या नेत्यानी केलेल्या बेलगाम वक्तव्यामुळे तर आगीत तेल ओतले गेले.विरोधकांनी सरकारवर एकामागोमाग जोरदार हल्ले चढवले.त्यामुळे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…

Read More