दीपक मोहिते,
धावपळीच्या या जगात
मनसोक्त जगून घ्या,
क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि. कधी विकेट जाईल,याची काहीच शाश्वती नसते कोणालाही… आयुष्य जाते ते रुसण्या फुगण्यात, अबोला धरण्यात,बऱ्याचदा आधी कोणी बोलावे,या अहंकारात वर्षानुवर्षे निघून जातात.जीवनाच्या वाटचालीत कोणीच कोणाचा कायमचा साथीदार नसतो मित्रानो. आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त आपले स्थान केवळ फोटोफ्रेममध्येच असते.ती फोटोफ्रेम पाहून लोक आपल्या आठवणी
जागवत असतात.जगून घ्या,बोलून घ्या,मनमुराद हसून घ्या,आलंच रडायला तर रडूनही घ्या.आपल्यावर कोणी रुसले असेल तर स्वतः त्याच्याशी बोला. प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.वय,नोकरी, व्यवसाय,प्रतिष्ठा,जात-पात, धर्म यापलीकडे जाऊन जगता आल पाहिजे. नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या.लहानपणी वाटत मोठ व्हावं,मोठेपणी वाटत श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटत परत लहान व्हावं.या सगळ्या चक्रव्युव्हात जगायचं मात्र राहून जात.ज्याला जे आवडत त्यासाठी स्वतः वेळ काढा.खूप कमवून तरी कुठ घेऊन जायचं आहे ? आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आल् पाहिजे,यावर ही आपला अभ्यास हवा. आज मन मारून जगालही, पण तुमच्या मनाचं काय ? पैसे नक्कीच कमवा पण स्वत:साठीही थोड जगा मित्रानो.खूप काही कमवालही पण स्वतःचे छंद,स्वतःची आवड, स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सारं काही कमावूनही आपण कफल्लकच आहोत,म्हणून मित्रांनो जगायचं राहून जाईल,असे जगू नका,अस जगा की ज्या जगण्यात फार मोठा आनंद आहे.जन्माला येताना रडत आलो,पण जाताना आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य असायला हवं.त्यामुळे मिळालेल्या जीवनात सारी दुःखे बाजूला सारत मनसोक्त जगून घ्या.

