Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते पालघर जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न,समस्या सुटत नसल्यामुळे काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.त्यामुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत बैठक तहकूब केली.या बैठकीनंतर शरद पवार गटाचे आ.सुनिल भुसारा यांनी पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा थेट आरोप केला. काल झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी अहवाल पूर्ण केला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित अधिकाऱ्यांवर भडकले.मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.आ.सुनिल भुसारा यांनी अधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नसतील तर सर्वसामान्यांचे काय ? असा सवाल उपस्थित करत थेट पालकमंत्र्यांनाच लक्ष्य केले.अधिकारीवर्गाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या समस्या प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील रस्त्यांची…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पक्षनिधी गोळा करण्यास आयोगाची संमती,ठाकरे व पवार गटात उत्साहाचे वातावरण, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला ( उबाठा ) मोठा दिलासा मिळाला आहे.आयोगाने त्यांना पक्षनिधी स्विकारण्यास मंजुरी दिली आहे.आयोगाच्या या निर्णयामुळे पक्षात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यापूर्वी आयोगाने शरद पवार गटालाही पक्षनिधी स्विकारण्यास मंजुरी दिली होती.आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार हे आता पक्षाचे नाव व चिन्ह परत मिळावे,यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत.त्यांच्या पक्षांनी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.त्याचा निकालही आपल्या बाजूने लागेल,अशी त्यांना खात्री वाटत आहे. पक्ष फोडणे,आमदार पळवणे व अन्य अनिष्ट बाबींना हवा देत भाजपने राज्यात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” कॅगने राज्य सरकारची लक्तरे वेशीला टांगली,” सवंग लोकप्रियता व पुन्हा सत्तेत येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी सार्वजनिक पैश्याची सध्या जी उधळपट्टी चालवली आहे,ती भविष्यात राज्याला त्रासदायक ठरणारी आहे.या अशा उधळपट्टीमुळे राज्यावर सध्या ८ लाख कोटी रु.कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे.यावर भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी ( कॅग ) आपल्या अहवालात या उधळपट्टीवर कडक ताशेरे ओढले आहेत. राज्यात एकूण शंभरहून अधिक उपक्रम,महामंडळे व संस्था आहेत,त्यापैकी ४० ते ५० महामंडळाचा तोटा ५५ हजार कोटी रु.वर गेला आहे.एसटी महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतनही देऊ शकत नाही,तर गर्भश्रीमंत अशी ओळख असलेले मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणही आता कर्जात आखंड बुडाला आहे.या सर्व…

Read More

दीपक मोहिते, भयाण वास्तव, आधी हाताला चटके,मग मिळते भाकर, ग्रामीण भागातील मुलं शिकली सवरली की त्यांची पावले रोजगार मिळवण्यासाठी मोठ्या शहराकडे वळू लागतात.गावी असलेल्या कटुंबियाचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना असा निर्णय घ्यावा लागतो.मात्र,त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या बायका देखील आपल्या मूलाबाळासह सासू सासऱ्या सोबत न राहता, आपल्या माहेरी निघून जातात.कालांतराने त्याही,” मुलांचे शिक्षण ,” या गोंडस नावाखाली शहरात राहणाऱ्या आपल्या पतीकडे निघून जातात.रोजी-रोटी व मुलांचे शिक्षण,अशा दोन कारणामुळे गावात राहणाऱ्या मायबापाचे उर्वरीत आयुष्य देखील हलाखीत व्यतीत होऊ लागते.पण त्यांना आपले गांव सोडवत नाही. आपल्या घराला कुलूप लागू नये,म्हणून हे जन्मदाते मायबाप आपले गाव मरेपर्यंत सोडत नाहीत.आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत वृद्ध जोडप्याला हाताने करून खावे…

Read More