दीपक मोहिते,
नागपूर येथे उद्यापासून ब्रिक्स संघटनेची दोन दिवसीय शिखर परिषद,
उद्या नागपूर येथे ब्रिक्स या संघटनेची शिखर परिषद होत आहे.ब्रिक्स म्हणजे नेमके काय ? ही संघटना कशी काम करते ? ती स्थापन करण्यामागे नेमकी काय कारणे आहेत ? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी या लेखातून करणार आहे.
सन २००६ मध्ये विकसनशील देशांचे एक शक्तिशाली संघटन असावे, असा उद्देश बाळगून ब्राझील,रशिया,इंडिया,
चायना व साऊथ आफ्रिका
,या देशाच्या देशाच्या पहिल्या अक्षरापासून ( B.R.I.C.S. ) बनले आहे. २०२५ मध्ये संघटनेचा विस्तार करण्यात आला. इथिओपिया, इजिप्त, इराण,सौदी अरेबिया,संयुक्त अरब अमिराती व इंडोनेशिया या नवीन देशांचा समावेश करण्यात आला. या संघटनेचे मुख्यालय चीनच्या शांघाय या शहरात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाश्चिमात्य देशाचे असलेले वर्चस्व कमी करणे, संघटनेच्या सदस्य देशांची अर्थव्यवस्था बळकट करणे, परस्पर व्यापार व सहकार्य वाढवणे, असे उद्देश संघटना स्थापन करण्यामागे आहेत. हे सारे उद्देश १०० % पूर्ण झाले नसले तरी ब्रिक्स सदस्य देश, हे जागतिक लोकसंख्येच्या ४८ % तर जागतिक जीडीपीच्या ३९.५ % इतके प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या या विस्तारित संघटनेतील देशाची एकत्रित लोकसंख्या लवकरच ३.६० अब्ज इतकी होईल, ती जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४८ % इतकी होणार आहे. तसेच या सर्व सदस्य देशाची अर्थव्यवस्था २९.५ ट्रीलियन डॉलर्स होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत ३०.५ % असेल. त्यामुळे नव्याने उदयाला येणाऱ्या आर्थिक महासत्ताचे म्हणणे, जी – २० या गटातील महासत्ता असलेल्या देशानी ऐकून घ्यावे,अशी ब्रिक्स संघटनेची अपेक्षा आहे. या संघटनेने स्वतःची न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन केली असून ती सदस्य देशांमधील पायाभूत सुविधा व शाश्वत विकास प्रकल्पाना निधी पुरवते. या माध्यमातून संघटना जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असलेली डॉलर्सची मक्तेदारी मोडून काढण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. अशा या संघटनेची दोन दिवसीय शिखर परिषद उद्यापासून नागपूर शहरात होत आहे. या परिषदेची संपूर्ण व्यवस्था रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. युक्रेन व मध्यपूर्वेतील युद्धासंदर्भात संघटना कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

