दीपक मोहिते,
शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड मारहाण प्रकरणी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात…
शिवसेनेचे ( शिंदे गट ) वादग्रस्त आ.संजय गायकवाड हे
मंत्रालयाशेजारी असलेल्या कँटिंनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत.आज घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून,गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.आ.गायकवाड यांच्यावर यापूर्वी देखील मारहाण केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत.
संजय गायकवाड यांनी कँन्टीनमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.त्यांचा आरोप आहे की,कँन्टीनमधून देण्यात आलेली डाळ,ही शिळी आणि वास येणारी होती.याबाबत कँन्टीन व्यवस्थापकाशी त्यांचा वाद झाला.हा वाद इतका विकोपाला गेला की, गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,गायकवाड यांनी व्यवस्थापकाला धारेवर धरत कठोर शब्दांत सुनावले.
आमदार निवासासारख्या उच्चस्तरीय ठिकाणी अशी घटना घडल्यामुळे कर्मचारी आणि इतर आमदारांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. कँन्टीन कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून,गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची माहिती आकाशवाणी आमदार निवास प्रशासनाला देण्यात आली असून,तपास सुरू आहे.
संजय गायकवाड यांनी या घटनेची दखल घेत सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. कँन्टीनमधील नित्कृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत ते प्रशासनाला जाब विचारणार आहेत.
त्यामुळे विधानसभेतही या प्रकरणावरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे.गायकवाड यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या आक्रमक वक्तव्ये करणे आणि प्रकारच्या वागण्यामुळे ते वादात सापडले
आहेत.
संजय गायकवाड हे महाराष्ट्रातील वादग्रस्त आमदारांपैकी एक म्हणून ओळखले जातात.आता आमदार निवासातील या मारहाणीच्या घटनेमुळे त्यांच्यावर तीव्र स्वरूपात टीका होत आहे.सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.अनेकांनी गायकवाड यांच्या वर्तनाचा निषेध केला आहे,तर काहींनी कँन्टीनमधील जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सदर कँटिंनचा कंत्राटदाराचे टेंडर हे मनोरा आमदार निवासाचे होते.पण मनोरा आमदार निवास तोडल्यानंतर २०१८ मध्ये या कंत्राटदाराला आकाशवाणीच्या शेजारी असलेल्या आमदार निवासात जागा देण्यात आली.त्याची मुदत २०२० पर्यंत होती.मात्र त्यानंतर नवीन निविदा न काढता त्याला दोन वेळा मुदत वाढवून दिली. या कंत्राटदाराच्या कँटीन मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचा दर्जा खाण्यालायक नसतो, अशा अनेकदा तक्रारी येऊनही कँटीन प्रशासन कायम दुर्लक्ष करत आले.यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.

