सुरेश वैद्य,पालघर
पालघर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक खताचा साठा,
पालघर जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ( आरसीएफ ) कंपनीकडून सर्व कृषी सेवा केंद्रांना मंजूर आवंटनानुसार खत पुरवठा करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खतसाठा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
खत पुरवठ्याचा संपूर्ण तपशील :-
( एप्रिल ते १३ जून २०२५ ):एप्रिल २०२५: मंजूर आवंटन १,३१० मेट्रिक टन; प्रत्यक्ष पुरवठा १,९४८ मेट्रिक टन.मे २०२५: मंजूर आवंटन १,७०२ मेट्रिक टन; प्रत्यक्ष पुरवठा १,७७४ मेट्रिक टन.१३ जून २०२५ पर्यंत: मंजूर आवंटन २,७५० मेट्रिक टन; प्रत्यक्ष पुरवठा २,४७२ मेट्रिक टन.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६,१९४ मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा झाला आहे. सध्या किरकोळ विक्रीसाठी २,३३६.३६१ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असून,८४७ मेट्रिक टन संरक्षित खतसाठा शिल्लक आहे.
तालुकानिहाय उपलब्ध खताचा साठा,
डहाणू: ५७७.२२३ मेट्रिक टन
जव्हार: ९१.३६ मेट्रिक टन
मोखाडा: ६४.६३ मेट्रिक टन
वाडा: २११.२१५ मेट्रिक टन
वसई: २४७.०५४ मेट्रिक टन
पालघर: ४९२.२९ मेट्रिक टन
विक्रमगड: ३१३.७१४ मेट्रिक टन
तलासरी: ३३८.८७५ मेट्रिक टन
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते आणि बियाणे पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली घेण्यात येत आहे.संपूर्ण खरीप हंगामात खताची कमतरता भासू नये,यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी आठ तालुका आणि एक जिल्हास्तरीय भरारी पथक देखील नेमण्यात आले आहे.
तसेच पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते आणि बियाणे उपलब्ध होण्याबाबत कोणतीही अडचण येणार नाही,अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.पुरेशा खताच्या साठ्यामुळे आणि प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे.

