सचिन परब वसई,
दुसऱ्या आंबा महोत्सवाला उत्तम प्रतिसाद,
पालघर जिल्ह्यातील शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम वसई शेतकरी सोसायटी करत आहे.त्यासोबत आपला माल ही थेट ग्राहकांना विकत असल्यामुळे शेतकरी व ग्राहकांना फायदा होत असल्याचे प्रतिपादन सहकारी संस्था,वसई तालुका उपनिबंधक अमर शिंदे यांनी वसई शेतकरी सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आंबा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.
वसई तालुक्यातील वसई शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीच्या ८५ व्या वर्षाचे निमित्त साधून संस्थेच्या देवतलाव येथील आवारात आज पासून आंबा महोत्सव भरवण्यात आले आहे
या आंबा महोत्सवाचे उदघाटन वसई तालुका सहकारी संस्था उपनिबंधक अमर शिंदे आणि भाजपचे महामंत्री हेमंत म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले.
वसई शेतकरी सोसायटीच्या आंबा महोत्सवात बोर्डी येथील यज्ञेश सावे यांनी विविध जातीचे आंबे उदा.हापूस, केशर,तोतापूरी,पायरी इ. प्रकारचे आंबे ठेवण्यात आले आहेत.तर दुसरीकडे घोलवड येथील मागासवर्गीय बांधवांनी बांबू पासून बनवलेल्या शोभेच्या वस्तूचे प्रदर्शन देखील दादा वाडेकर यांची जय ऍग्रो प्रॉडक्ट कं.च्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये शेती व बागायतीसाठी लागणारी अवजारे,कृपा सिंधू ऑइल मिल व सुखदा ब्रँड होळी डंकच्या लाकडी घाण्याचे तेल,स्वयंसिद्ध महिला बचतगटाने तयार केलेले मसाले,लोणची,पापड इ. पदार्थ,ओंसई महिला बचतगटातर्फे बनवलेले विविध खाद्यपदार्थ,विनेश धोडीया यांची वारली पेंटीग,ओराग्रीन चिकू प्रॉडक्टस्,ड्रीम पॉवर सोल्युशनचे सोलर पॅनल,त्याच बरोबर आर्यमा फूड्स आगाशीची वसईची प्रसिद्ध सुकेळी हे सारे महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे.
या महोत्सवाला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.तर आंब्या बरोबरच सुकेळी,चिकूचे पदार्थ,लोणची आणि इतर वस्तूंना ग्राहकांकडून मागणी करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला सोसायटीचे चेअरमनसह उपाध्यक्ष समीर पाटील,मानद सचिव हरेश राऊत,आदी सर्व संचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

