वसंत भोईर,वाडा
वाडा येथे सासऱ्याकडून जावयाची हत्या,जावई जागीच ठार,
सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने काटा काढल्याची घटना वाडा तालुक्यातील कवठेपाडा येथे घडली आहे.जावयाच्या या कारनाम्यामुळे सासऱ्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी झोपेतच असलेल्या जावयाच्या डोक्यात कुराड घातली. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी होऊन जागीच मूत पावला. याप्रकरणी वाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सासर्याला अटक केली आहे.
कवटेपाडा येथे राहणारे जाणू कवठे यांच्या मुलीबरोबर युवराज जगताप याचा प्रेम विवाह झाला होता.जानू यांची मुलगी एस.टी.महामंडळात नोकरीला आहे.जावई युवराज हा बेरोजगार होता तो काम करत नव्हता.मात्र गेल्या काही वर्षापासून सरकारी नोकरी लावतो,असे अमिष दाखवून त्याने अनेकांची फसवणूक सुरू केली होती.त्याच्या या कारनाम्यामुळे सासरे जानू यांचा त्याच्याशी अनेकदा वाद झाला होता.मात्र त्यानंतरही युवराजच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.तो नोकरीचे आमिष दाखवून लाख ते चार लाख रु.उकळत होता. युवराज हा मूळचा सातारा जिल्ह्यातला,पण लग्नानंतर तो कवठेपाडा येथे राहत होता. जावयाच्या या कारनाम्यामुळे हैराण झालेल्या सासर्याने शेवटी हे टोकाचे पाऊल उचलले.त्यांनी संतापाच्या भरात जावयाला संपवण्याचे ठरवले.त्यानुसार ते जावयाच्या घरी गेले आणि जावई झोपेत असताना जानू यांनी त्याच्या मानेवर आणि डोक्यावर कु-हाडीने घाव घातले.या हल्ल्यात युवराज गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाडा पोलिसांनी आरोपी जाणू कवठे याला अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे करत आहेत.

