सुरेश काटे,तलासरी
तलासरी पोलिसांनी आठ लाखाचा गुटखा पकडला,एकजण अटकेत…
राज्यात गुटख्यावर बंदी असली तरी शेजारच्या गुजरात राज्यात तसेच केंद्रशासित दादरा नगरहवेली भागातून गुटख्याची वाहतूक होत असते. दररोज शेकडो गुटख्याच्या गाड्या महाराष्ट्रात प्रवेश करत असतात.यावर कडक कारवाई होत नसली तरी पोलिसांकडून अधून मधून काही किरकोळ कारवाया होत असतात.
तलासरी पोलिसांकडून रात्री १२ च्या सुमारास गुजरात राज्यातून भिवंडी येथे परचुरण मालाच्या आड लपवून गुटखा घेउन जात असताना वडवली गावाचे हद्दीत दयानंद हॉस्पिटल समोर पकडला यावेळी ७ लाख ६२ हजार ७२० गुटख्यासह ३२ लाख ६२ हजार ७२० रु.चा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असगर भुरा अली,वय ४६ वर्षे, रा.ग्राम खान पुरघाटी, जि.नूहु मेवात,असे आरोपीचे नाव आहे.

