वसंत भोईर,वाडा
केबल खोदकामामुळे राज्यमार्ग बनला मृत्यूचा सापळा,
वाडा- भिवंडी -मनोर राज्यमार्गालगत खोदकाम करून केबल टाकण्याच्या नावाखाली जागोजागी खोदण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गांवर अनेक अपघात होत असून हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
या मार्गावर असलेल्या भावेघर येथील फिडरवरून कोंढले व उसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.त्यासाठी वाडा भिवंडी -मनोर महामार्गावर खोदकाम करण्यात येत आहे.या खोदकामामुळे रस्त्याची पार दुर्दशा झाली असुन नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे ही लाईन टाकण्यात येत आहे.या खोदकामामुळे येथे अपघात होत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले हे काम त्वरित बंद करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वाडा -भिवंडी-मनोर महामार्गावर केबल टाकण्याचे जे काम सुरू होते ते नियम बाह्य असल्याने काम बंद करण्याचे पत्र परवाच विभागाला देण्यात आले आहे. तरीदेखील काम सुरू असेल तर ते तत्काळ बंद करण्यात येईल.
– पोपट चव्हाण, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर नं.2

