वसंत भोईर,वाडा
शेतकऱ्यांच्या भाताचे पैसे तत्काळ बँकेत जमा करा अन्यथा आक्रोश आंदोलन छेडणार
– ज्योतीताई ठाकरे
आदिवासी विकास महामंडळाने घेतलेल्या भाताचे पैसे हे केवळ प्रशासनातील पदाधिकारी अधिकारी यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने हे पैसे रखडले आहेत.त्यांच्या या मनमानी कारभाराचा फटका ऐन होळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बसला आहे.येत्या २० मार्चपर्यंत शेतकऱ्यांना भाताचे पैसे मिळाले नाही तर शिवसेना आक्रोश आंदोलन छेडून शेतकऱ्यांचे पैसे मिळवणार असल्याचे यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी बोलताना सांगितले.
आज तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )
सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले.शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदार कार्यालय परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता.वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आंदोलकांमध्ये जाऊन त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या,व त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले,त्यामुळे आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
आंदोलनास शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरे,पालघर जिल्हाप्रमुख अनुप पाटील,सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे,उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील,प्रकाश केणे, कांती देशमुख,तालुकाप्रमुख निलेश पाटील,शहर प्रमुख प्रमोद घोलप,शहर संघटक भरत गायकवाड, उपतालुकाप्रमुख गजानन म्हसकर,राजू शीलोत्री,ज्येष्ठ शिवसैनिक दयानंद पाटील, विभागीय उपतालुकाप्रमुख जगदीश पाटील, तालुका सचिव सागर भोईर,तालुका संघटक मनीष पाटील आदीसह तालुक्यातील शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

