संजय नेवे,विक्रमगड,
पालघर जिल्ह्यातील रोजगार हमीच्या कामावरील मजुरांना वेळेवर मजुरी मिळावी,
पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून,येथे मोठ्या प्रमाणावर मजूर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार मिळवतात.मात्र मजुरांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात खा.डॉ.हेमंत विष्णु सवरा यांनी संसदेत सरकारला प्रश्न विचारला की, “ पालघर जिल्ह्यातील मजुरांना वेळेवर वेतन मिळावे,यासाठी सरकार कोणत्या ठोस उपाययोजना करत आहे ?,”
यावर उत्तर देताना संबंधित विभागाच्या मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले की, “ १०० दिवसांची मजुरी वेळेवर देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.”
मागील सरकारच्या कार्यकाळात,२०१३ – १४ मध्ये मजुरांना तब्बल ९ महिने मजुरी मिळाली नव्हती. मात्र, सध्याचे सरकार हा विलंब दूर करत मजुरांचा प्रत्येक पैसा त्यांच्या खात्यात वेळेवर जमा करेल,त्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत.
सरकार मजुरांना त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी प्राधान्याने काम करत असून, मजुरीच्या विलंबास आळा घालण्यासाठी आधुनिक प्रणालींचा अवलंब केला जात आहे.मजुरांना वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने वेतन मिळावे,यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

