वसंत भोईर, वाडा
हक्काच्या पैशासाठी बळीराजाची फरपट सुरू,आज आंदोलन होणार,
आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या भाताचे पैसे शेतकऱ्यांना तीन महिन्यानंतरही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आला आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या भाताचे पैसे तातडीने मिळावेत या मागणीसाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज वाडा तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख निलेश पाटील यांनी दिली.
भात पीक लागवडीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे.३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांकडून बँक शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ केले जाते.त्यामुळे ही रक्कम ३१ मार्च पूर्वी, मिळणे गरजेचे आहे.मात्र काही कारणांमुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शासनाने ३१ मार्चपर्यंत भात विक्रीची रक्कम बँकेत जमा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्रावर जाने.मध्ये भातविक्री केली आहे.मात्र त्याचे पैसे अजून मिळाले नाहीत.त्यामुळे सेवा सहकारी सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणार कशी ?
– गोविंद पाटील, शेतकरी खरीवली

