सुरेश काटे,तलासरी
तलासरी तालुक्यात २७ शेतकऱ्यांना विहिरी मंजुर,
आदिवासी शेतकऱ्यांनी शेती उत्पन्नातुन आपला विकास करावा,आपले आर्थिक स्रोत वाढावावे,यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.या अनुदानातुन विहीर बांधून आपल्या शेतीसाठी पाण्याचे स्रोत निर्माण करणे, असा शासनाचा उद्देश आहे.
तलासरी तालुक्यात पंचायत समितीतर्फे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येत असून या योजने द्वारे आदिवासी शेतकऱ्याला जो खातेदार आहे,त्याला नवीन सिंचन विहीर बांधणे,विहीर दुरुस्ती करणे,शेततळे अस्तरीकरण इ.कामासाठी अनुदान दिले जाते.
नवीन विहिरीसाठी अडीच लाख रु.जुनी विहीर दुरुस्ती साठी रुपये पन्नास हजार रु. शेततळे अस्तरीकरणासाठी कमाल एक लाख रु.इतके अनुदान देण्यात येते.
तलासरी पंचायत समितीतर्फे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने मधून एकूण २६ सिंचन विहिरीना मंजुरी देण्यात आली आहे.त्यापैकी १७ शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण करून प्रत्येकी अडीच लाख रु.अनुदानचा लाभ घेतला.तर ४ विहिरीची कामे प्रगती पथावर आहेत,५ शेतकऱ्यांनी अजून आपल्या विहिरीची कामे सुरु केलेली नाहीत,या विहिरी पूर्ण करणेबाबत कृषी विभागाकडून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.विहिरीचे बांधकाम सुरु करून जसजसे काम पूर्ण होते,तसे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत असते.
शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतात सिंचन विहीर बांधून शेती उत्पन्नातुन आपले आर्थिक स्रोत वाढवावे,विहीर बांधकाम करताच अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम लवकर पूर्ण करावे, –
तेजल गावित, कृषी अधिकारी तलासरी

