संजय लांडगे,वाडा,
श्रमजीवी संघटनेतर्फे वाडा पंचायत समितीवर हिशोब आंदोलन,
श्रमजीवी संघटनेने वाडा पंचायत समितीवर जलजीवन मिशन योजनेचे पाणी ३१ मार्च २०२४ रोजी प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी पोहोचणे आवश्यक होते.मात्र एप्रिल २०२४ च्या आंदोलनात लेखी आश्वासने देऊनही अजूनही पोहचले नाही म्हणून हंडे – कळशी घेऊन शेकडो महिला हिशोब आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आबिटघर व १७ गावे यांसाठी कामे प्रगती पथावर असलेल्या योजनेचा प्रत्यक्ष लोकांनी हिशोब घेतला. स्वतः ठेकेदार,भोईर उपभियंता जीवन प्राधिकरण उपविभाग विरार उपस्थित होते.मात्र जलजीवन मिशन योजनेचे तालुक्यातील सर्व योजनेचे ठेकेदार अनुपस्थित राहिल्यामुळे चर्चा कोणाशी करायची असा प्रश्न निर्माण झाला होता.जोपर्यंत चर्चे करिता कार्यकारी अभियंता, उपभियंता,कनिष्ठ अभियंता व सर्व ठेकेदार उपस्थित राहत नाहीत,तोपर्यंत चर्चा होणे शक्य नाही म्हणून आंदोलन प्रजासत्ताक दिनीही चालू राहणार असल्याचे तालुका अध्यक्ष भरत जाधव,तालुका सचिव सुरज दळवी यांनी सांगितले.यावेळी पालघर जिल्हा सरचिटणीस किशोर मढवी,जिल्हा कातकरी घटक सचिव आदेश वाघ,जिल्हा महिला ठिणगी उपप्रमुख रेखा पऱ्हाड,तालुका अध्यक्ष भरत जाधव,उपाध्यक्ष सुरेश पऱ्हाड/मोतीराम वारे,तालुका सचिव सुरज दळवी, तालुका संपर्क प्रमुख रफिक चौधरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

