अनंत भोईर,पालघर,
मतदारांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा – जिल्हाधिकारी बोडके,
मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,निवडणूक उपजिल्हाधिकारी रवींद्र हजारे,उपजिल्हाधिकारी विजया जाधव,महेश सागर, तेजस चव्हाण तसेच वरिष्ठ अधिकारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोविद बोडके म्हणाले की,भारतीय निवडणूक आयोगाची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली.तेव्हापासून २५ जाने.हा दिवस राष्टीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो.गेल्या काही वर्षांपासून हा दिवस आपण मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.त्यानिमित्ताने नवीन मतदार नोंदणीसाठी जिल्हा परिषद शिक्षक,नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत,तसेच इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी काम करत असतात. नवीन मतदार नोंदणी झालेली युवक व युवती या ठिकाणी उपस्थित आहेत.सध्या १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदाराची टक्केवारी वाढत असल्यामुळे त्यांची नोंदणी करून त्यांना मतदानामध्ये घेण्यासाठी प्रसारमाध्यमातून जनजागृती करण्यात यावी. तसेच नवीन मतदार नोंदणीसाठी युवक व युवतींनी मतदार नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.

