- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, वरुणराजाची अवकृपा, अनेक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके धोक्यात, गेल्या तीन दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार वृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.मुंबई,ठाणे,पालघर, रायगड,सोलापूर,नाशिक व इतर अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.या अस्मानी संकटामुळे राज्यातील खरीप पीके धोक्यात आली आहेत.दरम्यान हवामान विभागाने सलग तीन दिवस अतिवृष्टी होईल,असा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.मुंबई व ठाणे सारख्या महानगरात सर्वत्र पाणी साचून राहिल्यामुळे कालपासून दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.अनेक भागात रेल्वेरुळावरून पाणी वाहत आहे.त्यामुळे उपनगरीय सेवा देखील विस्कळीत झाली आहे.हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाने शैक्षणिक संस्था ( शाळा…
दीपक मोहिते, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट ; आज शैक्षणिक संस्थाना सुट्टी जाहीर, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.त्या अधिकाराचा वापर करत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महाविद्यालये,शाळा,अंगणवाड्या व इतर शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा,जिल्हा परिषद शाळा,नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा,सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली…
दीपक मोहीते, ” रणसंग्राम,” जागावाटपानंतर महायुतीमध्ये होणार उद्रेक, आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला लोकसभा निवडणुकीसारखा फटका बसेल,अशा भितीतून गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यात दौरे सुरू झाले आहेत.काल त्यांनी नागपूर येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.आज ते नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत.येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी,हे पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही या दोघांनी राज्यात सतत दौरे केले होते.पण त्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही.ज्या विदर्भात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राहतात,त्या विदर्भात भाजपची प्रचंड पीछेहाट झाल्यामुळे शहा यांनी आता विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील राजकीय वातावरण महाविकास आघाडीला पोषक आहे,हे पाहून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मतदार,सरकारच्या भुलभुलैय्यात अडकणार नाहीत, राज्यात तीन इंजिनचे सरकार,सध्या पैश्याच्या खिरापती वाटण्यात मश्गुल असून,त्यांच्या या अशा वागण्याचा राज्याच्या तिजोरीवर किती भार पडत याच्याशी त्यांना कसलेही देणेघेणे नाही.आज या सत्तेसाठी बेफाम झालेल्या सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करण्याचे पाप केले आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी विधानसभा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अशी उधळपट्टी सुरू केली आहे.त्यांच्या या अशा वागण्यामुळे राज्याची विविध क्षेत्रात पीछेहाट सुरू झाली आहे.त्यामुळे राज्याची जनता त्यांना माफ करणार नाही.राज्यात विविध विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची हजारो कोटींची बिले गेल्या सहा महिन्यांपासून रखडली असून ठेकेदारांनी नवीन कामे सुरू करण्यास साफ नकार दिला आहे.तसेच त्यांच्या संघटनांनी आमची बिले मिळाली नाहीतर आंदोलन करण्याचा…
दीपक मोहिते, परतीचा पाऊस, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, काल रात्रीपासून राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.१५ दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक पिके धोक्यात आली आहेत.तर शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.दरम्यान हवामान विभागाने उद्या ऑरेंज व परवा रेड अलर्ट जाहीर केला आहे.हा परतीचा पाऊस असून तो यंदाही शेतीला फटका देणारा ठरणार आहे,अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षापासून राज्यात पर्जन्यमानाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.पावसाचे आगमन उशीराने होणे,मध्येच पावसाचे गायब होणे व शेती बहरल्यानंतर जाता जाता पिकांना फटका देणे,असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.मात्र यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले,त्यामुळे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीमधून अजित पवार गटाला बाहेर काढण्याचे षडयंत्र, गेल्या दोन ते तीन दिवसात दिल्लीत घडलेल्या वेगवान घडामोडीमुळे महायुतीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी आपल्या मनातले जागावाटप राज्यस्तरीय नेत्यांच्या मुखातून बोलायला सुरुवात केली आहे.त्यामुळे शिंदे व अजित पवार गट सावध झाले आहेत.भाजपच्या मनातले जागावाटप कसे आहे ? व हे दोन्ही गट का धास्तावले आहेत ? व या दोन्ही गटाचे या जागावाटपावर काय म्हणणे आहे ? या तीन प्रश्नाचे उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करूया. भाजपच्या दिल्लीश्वराच्या मनातील जागावाटप- १) भाजप-१६०, यापैकी १२५ जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचे राज्यस्तरीय भाजप नेत्याना टार्गेट, २) शिवसेना ( एकनाथ शिंदे गट )…
दीपक मोहिते, बदलापूर लैगिंक अत्याचार ; आरोपी अक्षय शिंदे पोलीसांच्या गोळीबारात ठार, विरोधकांकडून संशय व्यक्त, बदलापूरच्या शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावल्याने पोलिसांनी अक्षय शिंदेचा एनकाऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे. बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलीसांवरही गोळीबार केल्याची माहिती आहे.तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता पोलीस त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली.त्यानंतर पोलिसांनी कळवा रुग्णालयात दाखल केले.तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांची बंदूक हिसकावुन अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला. एकूण तीन राऊंड फायर केलं.पोलिसांच्या पायांवर गोळीबार झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेत…
दीपक मोहिते, बदलापूर लैगिंक अत्याचार; शांती सेना पोलिस गोळीबारात ठार शंका व्यक्त करतात, बदलापूरच्या घडलेल्या घडामोडींमध्ये उर्जा शक्तीने गोळीबारात थार मारली. त्याची पोलिसांची सत्ता आली हिरावून अक्षय शक्तीचा घटना एनसकावल्याची माहिती आहे. बदलापुरातील सक्रियतेने अक्षय शक्तीने पोलिसही गोळीबारची माहिती आहे. पोलिसांची बंदूक हिसकावुन अक्षयने व्हॅन्सनीच पोलिसांचा गोळीबार केला. एकूण तीन राऊंड फायर पॉवर्स. पोलिस राऊंडाच्या पायथ्याशी साध्या उभारणीसाठी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोबार केला. या शक्तीवान ऊर्जाचा वापर करून तयार करण्याची माहिती आहे. पोलीस फक्त अजून काही माहिती दिली नाही. सत्ताने पॅनेल अल्पवयीन स्त्री शोषण करण्याचा प्रश्न होता. दरम्यान,अक्षाचा एन्काऊंटर बेंजयचा खुलासानी केला आहे. अक्षयने स्वत::वर गोळी झाडली की आणखी काही दुसरं…
दीपक मोहिते, मराठा समाजाच्या आरक्षणाचा ४२ वर्षाचा खडतर प्रवास, मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांची प्रकृती खूप खालावली आहे.या दरम्यान ओबीसी समाजाच्या नेत्यांनीही त्यांच्या बाजूच्या परिसरात आपले उपोषण सुरू केल्यामुळे अंतरवली सराटी वडगोद्री या दोन गावांत सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेली पाच दशके मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत पडला आहे.४५ वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे,अशी मागणी माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांनी केली,त्यानंतर २२ मार्च १९८२ रोजी मुंबईत त्यांनी विशाल मोर्चा काढला.तत्कालीन मुख्यमंत्री स्व.बाबासाहेब भोसले यांनी त्यांची ही मागणी मान्य केली.मात्र…
दीपक मोहिते, जलसंकटाचा धोका वेळीच ओळखा, यंदा वरुणराजाने आपल्यावर कृपा केली असली तरी राज्याच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे.,मराठवाडा विभागात अनेक गावातील लोकांची पाण्यासाठी होणारी वणवण अद्याप थांबलेली नाही.राज्याच्या सर्व धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली असली तरी येणारा उन्हाळा हा ग्रामीण भागातील जनतेसाठी तापदायक ठरणार आहे.राज्यात एकूण २ हजार ९९४ लहानमोठी धरणे आहेत,या धरणामध्ये सरासरी ६३ % पाणीसाठा आहे.गेल्या वर्षी हा साठा ६८ % इतका होता.मराठवाड्याच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा ४८ % वर आल्यामुळे पुढच्या वर्षी मार्च ते जून असे चार महिने मराठवाडावासियावर तीव्र पाणीटंचाईचे अस्मानी संकट कोसळणार आहे.मात्र आपले सरकार या दुष्काळाचा सामना करण्यासंदर्भात फारसे संवेदनशील नसल्याचे दिसून येत…
