Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, विरार पूर्वेस मौजे भालीवली, ता. वसई, जि. पालघर येथील सिंचन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत सदर अतिक्रमणाची तात्काळ पाहणी करून ते हटवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते एलायस जोसेफ डिसिल्व्हा यांनी तहसीलदार, वसई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, भालीवली येथील गट क्र. ३६, क्षेत्र १२ गुंठे, हिस्सा क्र. २३, क्षेत्रफळ ५.८ आर. ही सिंचन विभागाची शासकीय जागा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे शासकीय जमिनीचा वापर बाधित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची महसूल विभाग, सिंचन विभाग व संबंधित यंत्रणेकडून संयुक्त पाहणी करून वस्तुस्थितीची खातरजमा करण्यात यावी,…

Read More

दीपक मोहिते, एकमेकांच्या उरावर बसणे सोडा व करदात्यांचे हीत जोपासा, वसई विरार शहर महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षात सध्या वारंवार जे मानापमानाचे नाट्य रंगते, त्यामुळे क्षेत्राच्या विकासाचा बट्ट्याबोळ होत आहे. या महानगरपालिकेची प्रत्येक महासभा गोंधळात पार पडत असते. आता विषय समित्याच्या बैठकावर देखील बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये समन्वय साधून परिसर विकासाचा गाडा पुढे नेण्यात महापौर यांची भूमिका महत्वाची असते, पण विद्यमान महापौर देखील ती पार पाडत नसल्याचे दिसून आले आहे. एकमेकांची मदत व सहकार्य, यावर आम्ही विकासाची कामे करू,अशा हाणाभाका घेणारे व आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता विकासाच्या प्रश्नावर एकमेकांच्या उरावर बसताना पहायला मिळत आहे. सोळा…

Read More

दीपक मोहिते, आम्ही वसईकर दूधखुळे नाहीत, राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. ग्राहकांच्या अनेक संघटना याप्रकरणी न्यायालयात गेल्या आहेत. तर अनेक ग्राहक हे वीजग्राहक संस्थांकडे दाद मागत आहेत. परंतु ज्या उद्योगपतीकडे या स्मार्टमिटरचे दायित्व आहे,ते अदानी तुमच्या आमच्या मागणीला भीक घालतील, अशी सुतराम शक्यता नाही. तसेच त्यांच्यासमोर गुडघे टेकणाऱ्या आपल्या सरकारकडून याविषयी काही निर्णय होईल, अशी शक्यताही नाही. या प्रकरणी विरोधी पक्षांनी राज्यसरकार विरोधात जोरदार टीकेची झोड उठवली असली तरी एकाही राजकीय पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचे ऐकिवात नाही. पण, वसई तालुका मात्र त्यास अपवाद ठरला. दोन दिवसापूर्वी वसई येथे सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्व…

Read More

दीपक मोहिते, पालघर येथे डॉक्टरांवर हल्ला ; न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी, कल्याण – डोंबिवली मागोमाग पालघर येथेही डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही मारहाण केली असून याप्रकरणी हल्लेखोरांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचार त्वरित सुरु न केल्यामुळे संतप्त झालेल्या या हल्लेखोरांनी हा प्रकार केला. न्यायालयाने या प्रकरणी डोंबिवलीचे नगरसेवक रमेश पाटील यांच्याबाबत केलेल्या कठोर कारवाईप्रमाणेच या हल्लेखोरावर कारवाई करण्यात यावी, अशी सर्वत्र मागणी करण्यात येत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, शहरप्रमुख राहुल घरत, उपतालुकाप्रमुख मनीष उर्फ…

Read More

दीपक मोहिते, नेपाळ नंतर भारताला सर्वाधिक धोका, गेल्या महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक संकटामध्ये सुमारे ५ हजार लोक अद्याप गायब आहेत. या आपत्तीमध्ये हजारो कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली. मदतीचे कार्य अद्याप सुरू आहे. या अस्मानी संकटामुळे नेपाळ हा पार खचून गेला आहे. त्याला सावरण्यासाठी जगभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. पण झालेल्या विध्वंसाचे प्रमाण लक्षात घेता हिमालयाच्या कुशीत विसावलेल्या या छोटेखानी देशाला सावरायला किमान पाच वर्षे लागणार आहेत. गेल्या काही वर्षापासून हिमालयातील अनेक हिमनद्या वेगाने वितळत आहेत. त्याचा भारतालाही धोका होऊ शकतो. हिमालय हा भारतासाठी ” वॉटर टॉवर,” आहे, पण तो वेगाने वितळू लागला आहे. १९९० ते २०२० या कालावधीत हिमालयातील…

Read More

पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ पासून धावणार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बद्दल सविस्तर माहिती :- सध्या या प्रोजेक्टचे ६१% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. गुजरातमधील पहिला टप्पा ( सुरत – वापी ) : ऑगस्ट २०२७ पासून पहिली कमर्शियल धाव सुरू होणार आहे. गुजरातचा पूर्ण पट्टा ( वापी ते साबरमती ) : डिसें. २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. संपूर्ण कॉरिडॉर ( मुंबई ते साबरमती ) : डिसें. २०२९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सुरुवातीचा अंदाजित खर्च रु. १,०८,००० कोटी होता. यापैकी ८१% म्हणजे रु. ८८ हजार कोटी रु.जपानची एजन्सी जे.आय.सी.ए. ( जपान इंटरनॅशनल कॊ – ऑपरेशन एजन्सी ) कर्ज म्हणून…

Read More

दीपक मोहिते, अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही, – सर्वोच्च न्यायालय, डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. “अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही,” असे न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.” वैद्यकीय क्षेत्राचा आदर न करणाऱ्यांना जामीन मिळू नये,” डॉक्टर, त्यातही महिला डॉक्टरवर जमावाने केलेल्या हल्ल्याचा मानसिक धक्का काय असतो, याची कल्पना करा, असे खंडपीठ म्हणाले.उच्च न्यायालयाने सुओ-मोटो दखल घेऊन जामीन स्थगित करणे ” पूर्णपणे योग्य होते,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारच्या याचिकेवर न्यायालयाने म्हात्रे यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात…

Read More

दीपक मोहिते, मी वसई विरार रस्त्यावरून येऊ तरी कसा ? – बाप्पा, गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या सहा दिवसावर आले आहे, पण आमचा बाप्पा सध्या विचारत पडला आहे. माझे प्रामाणिक भक्त मला वसई विरारच्या रस्त्यावरील खड्ड्यातून आणायचे कसे, अशा विवंचनेत सापडले आहेत, तर सत्ताधारी पक्षाची माणसे अदानीच्या स्मार्ट मिटरचा बागुलबोवा उभा करण्यात रमले आहेत.माझ्या सजावटीच्या स्पर्धा ते आवर्जून भरवत असतात, त्यासाठी लाखो रु. ची बक्षिसेही देत असतात, पण या मंडळींना रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात जाग येत नाही. झोपलेल्या माणसाला जागा करता येते, पण झोपण्याचे सोंग करणाऱ्याला कधीच जागे करता येत नाही. असे हे झोपल्याचे सोंग करणाऱ्या माझ्या तथाकथित भक्तांना मला कदापि जागे…

Read More

दीपक मोहिते, सर्वप्रथम नालासोपारा शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारा… वसई विरार शहर महानगरपालिकेने वसईचे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच स्मारकाची उभारणी करण्यासाठी पावले उचलण्याचे ठरवले आहे. सदर बाब कौतुकास्पद असून या ऐतिहासिक नगरीतील प्रत्येक नागरिकांनी त्याचे स्वागत करायलाच हवे. या महानगरपालिकेला सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही उपरती का व्हावी ? असा प्रश्न नक्कीच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो. सर्वप्रथम या ऐतिहासिक नगरीचे वैभव गेल्या ४० वर्षात कोणी हिरावून घेतले. या निसर्गसंपन्न परिसराला सिमेंट – काँक्रिटचे ओंगळ स्वरूप कसे आले ? विकास या गोंडस शब्दाखाली या ऐतिहासिक नगरीची वाताहत कोणी केली ? याचा सर्वप्रथम अंतर्मुख होऊन विचार व्हायला हवा. वसई विरार महापालिकेच्या…

Read More

दीपक मोहिते, पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका, काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी राजोडी समुद्रकिनारी भेट देऊन नुकतीच पाहणी केली. यावेळी स्वच्छतेविषयी विविध उपाययोजनेची माहिती घेतली. या समुद्रकिनारी बीच क्लीनिंग मशीनच्या साहाय्याने सुरु असलेल्या स्वच्छता कामाची त्यांनी पाहणी केली. आयुक्तानी दिलेल्या या भेटीचे नक्कीच कौतुक करायला हवे. पण त्याचबरोबर शहरातील अस्वच्छता, नाल्यातील कचरा व रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्याचे साम्राज्य इ. नागरी असुविधाचे काय ? असा प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा राहतो, यावर आयुक्ताची भूमिका काय ? आयुक्ताना समुद्रकिनारी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची काळजी आहे. पण शहरातील करदाते, भरमसाठ कर देऊनही मरणयातना भोगत असतात,…

Read More