Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत कामकाजाचा आढावा, महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली शनि.२४ ऑक्टो.२०२६ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात पालघर जिल्हा तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित निवडणूक यंत्रणेच्या कामकाजाबाबतची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पालघर जिल्हा आणि वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, मतदारयादी पुनरीक्षणाशी संबंधित कामकाज, दावे व हरकती दाखल करण्याच्या टप्प्यात प्रलंबित नमुने तसेच मतदारांना बजावण्यात येणाऱ्या नोटिशीं बाबतची…

Read More

दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” युरोपमधील आंदोलनामागे स्थलांतरण व बेरोजगारी ही दोन कारणे, अनेक दशके शांत राहिलेला युरोप सध्या धुमसत आहे. या महिन्यात फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, अल्बेनियामध्ये आंदोलने सुरू झाली आहेत. या आंदोनावर नियंत्रण आणण्यात या देशाच्या सरकारांना अद्याप यश आलेले नाही. गेल्या पंधरा दिवसात अब्जावधी रु. चे नुकसान झाले. या आंदोलनामागे एकच कारण नाही, तर अनेक कारणांचा एकत्रित स्फोट झाला आहे. जगण्याच्या खर्चाचा स्फोट, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. याविषयी प्रसिद्ध झालेल्या अहवालात वाढते इंधन दर, घरभाडे परवडत नसणे, शिक्षण आणि सार्वजनिक सेवांची घसरण इ. महत्वाची कारणे आहेत. स्पेन – पोर्तुगालमध्ये तर लोकांनी भाडेवाढी विरोधात तंबू ठोकून आंदोलन…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” ठाणे जिल्हा : राजकीय वार्तापत्र, एकनाथ शिंदे आपला बालेकिल्ला शाबूत राखणार का ? ठाणे जिल्ह्यात महायुतीमध्ये आता सुतळी बॉम्ब फुटू लागले आहेत. ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.भविष्यात या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या अशा भितीमुळे शिंदे यांनी या बालेकिल्ल्याच्या अवती – भवती भक्कम तटबंदी उभारण्याची तयारी चालवली आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे त्यांच्या पक्षाच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अंबरनाथमधील भाजपच्या नगरसेवकांनी काल थेट शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर उल्हासनगर मधील भाजपने महायुती तोडण्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठवून दिला आहे.…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” … तर वेगळे चित्र दिसले असते, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील सुमारे ५० हजार मतदार कुठे गेले ? असा सवाल माजी आ. हितेंद्र ठाकूर यांनी नुकताच उपस्थित केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काही इसमांना नांवे वगळण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्जाचे गट्ठेच्या गट्ठे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. वास्तविक आपले नांव समाविष्ट करणे किंवा वगळणे यासाठी कोणतेही अर्जदार समोर आले नसताना इतर व्यक्तींना अशाप्रकारे अर्जाचे गट्ठे देणे बेकायदेशीर होते. पण त्यावेळी कोणीही हरकत न घेतल्यामुळे अनेकांची नांवे वगळली गेली व बोगस नावांचा समावेश केला गेला. हा गैरप्रकार त्या निवडणुकीवर चांगलाच प्रभाव टाकणारा ठरला. निवडणुकीपूर्वी मतदारयादीत ज्या व्यक्तीची नांवे समाविष्ट करण्यात आली…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कथित ५०० कोटीचे प्रकरण ; शिंदे गट सध्या पिछेहाटीवर… जरांगे पाटील यांच्या कथित ५०० कोटीच्या आरोपानंतर महायुतीमधील भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोघांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. काल दिवसभर भाजपचे शिलेदार आक्रमक भूमिकेत होते. हा वाद लवकर मिटेल,असे असे वाटत नाही. त्यामुळे शिंदे गटाने आपल्या शिलेदारांना याप्रकरणी कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, असे फर्मावले आहे.गेल्या दोन दिवसात भाजप – शिवसेना ( शिंदे गट ) यांनी एकमेकांवर वार – पलटवार केल्यामुळे वाद चर्चेत राहीला. हा वाद असाच सुरु राहिल्यास आपली बदनामी होते, असे जाणवल्यानंतर पक्षाने यावर कोणीही बोलू नये, असा आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटम लाईन,” अरुणाचलमध्ये चीनची घुसखोरी ; आपले शौर्यदल भिडले, भारत – चीन सीमेवर असलेल्या अरुणाचल प्रदेश या राज्यात गेल्या दोन ते वर्षांपासून उभय देशामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानाकडून अधूनमधून घुसखोरी करण्याच्या घटना घडत असतात. अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात अप्पर सुबानसिरी या जिल्ह्याच्या टाकसिग – असाफिला सेक्टर मध्ये चिनी सैनिकांनी नुकताच असा घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय जवानांच्या नियमित गस्ती दरम्यान दोन्ही देशाचे जवान समोरासमोर आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे परत आले व त्यानी आपल्या हद्दीत सुमारे ६ ते ७ कि.मी. आत तंबू ठोकले.…

Read More

दीपक मोहिते, अर्थकारणाचे वारे सुसाट, आणखी चार बँकांची लवकरच विक्री आयडिबीआय बँकेचे खाजगीकरण केल्यानंतर केंद्र सरकार आणखी चार प्रमुख सरकारी बँकांमधील आपला हिस्सा ७५ टक्क्यांपर्यंत घटवण्याचा विचार करत आहे. या बँकामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ” किमान सार्वजनिक भाग भांडवलाचे नियम,” पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यास या बँकांचे २५ टक्के शेअर्स इतर गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होतील. याशिवाय केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करत आहे. या प्रक्रियेअंतर्गत आणखी दोन बँकांची…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात ८ हजार ३२० पात्र शेतकऱ्यांना ४७.३७ कोटींचा लाभ, नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत चार याद्यांमधून एकूण ८ हजार ३२० पात्र शेतकऱ्यांना सुमारे ४७ कोटी ३७ लाख रु.चा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी ३० सप्टें. २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रु.पर्यंत कर्जमाफी देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच कर्ज…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगेंना ताकद देणारे कोण ? शिंदे सेना संभ्रमावस्थेत… ५०० कोटींच्या कथित व्यवहारावरून महायुतीमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात ” प्रत्येक आमदाराने बाजूच्या तालुक्यातील आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्यास आपले नेते एकनाथ शिंदे हे भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात,” असे वक्तव्य केले. त्यानंतर अवघ्या काही तासात तथाकथित ५०० कोटीच्या व्यवहाराच्या ऑडियो क्लिप सर्वत्र व्हायरल झाली. हा केवळ योगायोग नसून सत्तास्पर्धेचा जीवघेणा खेळ सुरु झाल्याचे मानण्यात येत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजप व शिंदे गटाचे नेते आता एकमेकांवर तुटून पडत आहेत. शिंदे यांना बदनाम करण्यासाठी काही राजकीय…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय… गेली १५ वर्षांपासून महाराष्ट्र अवर्षण, पावसाचे अल्प प्रमाण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्जमाफ़ी इ. कारणाने सतत प्रकाशझोतात आहे. यापूर्वी कॉंग्रेस व सध्याचे महायुती सरकार या दोघानी या सर्व समस्यांवर काय उपाययोजना केली,हे राज्यातील तमाम जनतेने अनुभवले व अनुभवत आहे. परिस्थितीत किती बदल झाला ? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का ? त्याना कर्जमाफी मिळाली का ? असे एक ना अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यानी प्रसिद्धि माध्यमाना नुकतेच जे काही सांगितले,ते लक्षात घेता येणाऱ्या काळात राज्यातील शेतकऱ्याना अनंत अडचणी व संकटाना सामोरे जावे लागणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले…

Read More