Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” कॅगने राज्य सरकारची लक्तरे वेशीला टांगली,” सवंग लोकप्रियता व पुन्हा सत्तेत येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी सार्वजनिक पैश्याची सध्या जी उधळपट्टी चालवली आहे,ती भविष्यात राज्याला त्रासदायक ठरणारी आहे.या अशा उधळपट्टीमुळे राज्यावर सध्या ८ लाख कोटी रु.कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे.यावर भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी ( कॅग ) आपल्या अहवालात या उधळपट्टीवर कडक ताशेरे ओढले आहेत. राज्यात एकूण शंभरहून अधिक उपक्रम,महामंडळे व संस्था आहेत,त्यापैकी ४० ते ५० महामंडळाचा तोटा ५५ हजार कोटी रु.वर गेला आहे.एसटी महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतनही देऊ शकत नाही,तर गर्भश्रीमंत अशी ओळख असलेले मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणही आता कर्जात आखंड बुडाला आहे.या सर्व…

Read More

दीपक मोहिते, भयाण वास्तव, आधी हाताला चटके,मग मिळते भाकर, ग्रामीण भागातील मुलं शिकली सवरली की त्यांची पावले रोजगार मिळवण्यासाठी मोठ्या शहराकडे वळू लागतात.गावी असलेल्या कटुंबियाचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना असा निर्णय घ्यावा लागतो.मात्र,त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या बायका देखील आपल्या मूलाबाळासह सासू सासऱ्या सोबत न राहता, आपल्या माहेरी निघून जातात.कालांतराने त्याही,” मुलांचे शिक्षण ,” या गोंडस नावाखाली शहरात राहणाऱ्या आपल्या पतीकडे निघून जातात.रोजी-रोटी व मुलांचे शिक्षण,अशा दोन कारणामुळे गावात राहणाऱ्या मायबापाचे उर्वरीत आयुष्य देखील हलाखीत व्यतीत होऊ लागते.पण त्यांना आपले गांव सोडवत नाही. आपल्या घराला कुलूप लागू नये,म्हणून हे जन्मदाते मायबाप आपले गाव मरेपर्यंत सोडत नाहीत.आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत वृद्ध जोडप्याला हाताने करून खावे…

Read More