- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- गोकुळमध्ये सरकारचा हस्तक्षेप ; सहकार क्षेत्राला मारक ठरणार,
- मोदी सरकारची वाटचाल आता काट्याकुट्यानी भरलेली,
- महामार्गांवरचा विकास गावापर्यंत कधी पोहोचणार ?
- नालासोपारा प्रकरण ; सर्वानी एकत्र यायला हवे…
- लोकशाही व्यवस्थेत एकाधिकारशाहीला स्थान नाही…
- वातावरण बदलत चालल्यामुळे फडणवीस कासावीस,
- अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीत रिपब्लिकनची पीछेहाट ; ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार,
- नालासोपारा नागरिकांचे पलायन ; यापूर्वी असं कधीच घडलं नव्हते,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, गोकुळमध्ये सरकारचा हस्तक्षेप ; सहकार क्षेत्राला मारक ठरणार, गोकुळ प्रकरण हे फक्त एका दूध संघाच्या अध्यक्षपदाचं प्रकरण राहिलेलं नाही. ते आता सहकार, लोकशाही, जनादेश आणि सरकारचा हस्तक्षेप, या तीन मुद्द्यांवरचं राज्यव्यापी वादळ झालंय सविस्तर माहिती अशी कि,कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,स्थापना १९६३ उलाढाल : सुमारे ₹ ४००० कोटी (२०२४ – २५ ) दूध संकलन : रोज सुमारे १८ ते २० लाख लिटर जोडलेले शेतकरी : सुमारे ५ लाख दूध उत्पादक,८ हजार ०९ प्राथमिक संस्था, १ हजार ८१० गावे – दर १० दिवसांनी शेतकऱ्यांना सुमारे ₹ १०० कोटीचे वाटप होते. म्हणून गोकुळ ही फक्त डेअरी नाही, तर…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” मोदी सरकारची वाटचाल आता काट्याकुट्यानी भरलेली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर डिबेट करण्याचे आव्हान दिले आहे. हे आव्हान देताना राहुल गांधी म्हणाले, मोदी हे अनेक कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून मला व माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही असल्याचा आरोप करत सुटले आहेत. त्या मोदींना माझे आव्हान आहे. त्यानी माझ्यासमोर फक्त ५ मिनिटे बसावे, या ५ मिनिटात मोदी स्वतः कसे देशद्रोही आहेत, हे मी दाखवून देईन. त्यांनी आपला देश ट्रम्पला कसा विकला, त्यांनी अदानीची फाईल कशी ट्रम्पकडून बंद करायला लावली, हे मी पुराव्यासहित सिद्ध करून दाखवीन,त्यांच्या…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” महामार्गावरचा विकास गावापर्यंत कधी पोहोचणार ? महाराष्ट्र सध्या विकासाच्या एका मोठ्या वळणावर उभा आहे. एकीकडे मुंबईत कोस्टल रोड, ठाणे-बोरिवली ट्विन टनेल, अटल सेतू, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, उत्तन-विरार सी-लिंक यासारखे भव्य प्रकल्प उभे राहत आहेत. तर दुसरीकडे गावात मात्र लघु उद्योग बंद पडत आहेत, कुटीर उद्योगाला किंमत उरलेली नाही आणि महिला बचत गट कर्जासाठी बँकांच्या उंबरठ्यावर चपला झिजवत आहेत. हा विरोधाभासच आजच्या महाराष्ट्राच्या विकासाची खरी कहाणी सांगते. सरकारचा विकासाचा प्लॅन पाहिला तर तो बंदर, ईव्ही उद्योग, महामार्ग बांधणी, बुलेट ट्रेन, फ्लायओव्हर याभोवतीच फिरताना दिसतो. यात वाद नाही की हे प्रकल्प हवेत. वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र जगाच्या नकाशावर…
*lदीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नालासोपारा प्रकरण ; सर्वानी एकत्र यायला हवे… वसई तालुक्यात बहुजन विकास आघाडी व भाजप हे दोन पक्ष प्रत्येक प्रश्नावर एकमेकाविरोधात कायम दंड थोपटून उभे राहत असतात. प्रत्यक्षात या दोघांना करदात्याच्या अडचणी, समस्या तसेच परिसर विकासाशी कोणतेही देणेघेणे नसते. न केलेल्या विकासकामाचे श्रेय उपटण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकमेकांचे गळे आवळत असतात. यालाच आपण राजकारण म्हणत असतो. या अशा धूमश्चक्रीचा करदात्यांना कसलाही फायदा होत नसतो. त्यामुळे तेही त्यांच्या ” तीन पैश्याचा तमाशा,” च्या नौटंकीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. पण,चार दिवसापूर्वी नालासोपारा पूर्वेस श्रीराम नगर वसाहतीमध्ये जे काही घडलं, ते माणुसकीला काळिमा फासणारे होते. आपला महाराष्ट्र हा मणिपूर किंवा…
दीपक मोहिते, ” घडलंय बिघडलंय,” लोकशाही व्यवस्थेत एकाधिकारशाहीला स्थान नाही… अमेरिकेत नुकत्याच झालेल्या सिनेट व हाऊसच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ट्रम्प यांचे हवेत उडणारे विमान चांगलेच खाली आले आहे. एरवी डेमोक्रेट्सना विचित्र वागणूक देणाऱ्या ट्रम्प यांनी ” democrates did well,” अशा शब्दात अभिनंदन केले.राजकारणात चढउतार असतात, त्यामुळे कोणीही अहंकाराने पालथे पडायचे नसते. पण गेल्या दोन वर्षांपासून ट्रम्प हे सातत्याने नको ते उपदव्याप करत राहीले. अमेरिकन जनतेने याकाळात खूप काही सोसले. अखेर संधी मिळताच त्यांनी आपली वाघनखे बाहेर काढली व डोनाल्ड ट्रम्प आता घायाळ व गलितगात्र झालेल्या सिंहासारखे वाटू लागले आहेत. म्हणून राजकारणात कधी काय…
दीपक मोहिते, घडलंय बिघडलंय, वातावरण बदलत चालल्यामुळे फडणवीस कासावीस, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चेत राहण्यासाठी काहीही करतात, हे आजवर अनेकदा आपल्याला अनुभवायला मिळाले. काल त्यांनी देशात विरोधक रिजीम चेंज करण्यासाठी अराजकता निर्माण करत आहेत, असा आरोप करत भाजपतर्फे मोर्चा काढला. त्यांच्या या मोर्चावर राज ठाकरे यांनी चांगलेच तोंडसूख घेतले.” अरे तुम्ही सत्तेत असताना आपल्याच सरकार विरोधात मोर्चे कसले काढता ? ” असा प्रश्न उपस्थित केला.भाजप उद्यापासून राज्यभरात मोर्चे काढणार आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी ठाण्यात पदयात्रा काढली होती. *वास्तविक भाजप हा सत्तेत असताना त्यांना आपल्याच सरकारविरोधात मोर्चे काढण्याची त्यांच्यावर पाळी यावी, ही एकप्रकारची शोकांतिका आहे. देश व राज्यातील सत्ता तुमच्या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीत रिपब्लिकनची पीछेहाट ; ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला लगाम बसणार, अतिरेकपणा फार काळ चालत नाही, हे अमेरिकन जनतेने आज दाखवून दिले आहे. ट्रम्प प्रशासनाचे युद्धाखोरीचे धोरण जनतेला मान्य नाही, हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. सिनेटच्या झालेल्या निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्षाने ५२ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला ४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजुन आठ जागांचे निकाल हाती यायचे आहेत. या निकालामुळे ट्रम्प यांना आता मनमानी कारभार करता येणार नाही. या सिनेट निवडणुकीत १०० जागांपैकी डेमोक्रॅट्सनी ५२ जागा तर रिपब्लिकनना ४० जागा मिळाल्या असून डेमोक्रॅट्सनी निसटता पण निर्णायक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नालासोपारा नागरिकांचे पलायन ; यापूर्वी असं कधीच घडलं नव्हते… दोन दिवसापूर्वी नालासोपारा शहराच्या पूर्व भागात जे काही घडलं त्याची तुलना मणिपूर येथे घडत असलेल्या घटनेशी केल्यास ते वावगे ठरू नये. प्रचंड दहशतीखाली असलेल्या श्रीरामनगर भागातील अनेक नागरिकांनी नेसत्या कपड्यांनीशी आपल्या बायका मुलासह पळ काढला व आपला जीव वाचवला. सदर बाब स्थानिक पोलीस, राज्याचे गृहविभाग व ज्यांच्यावर या विभागाची जबाबदारी आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नक्कीच लांछनास्पद आहे. यापूर्वी ” दहशतीला घाबरून लोकांचे पलायन,” असं कधीच घडलं नव्हतं, त्यामुळे महायुती सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवणारे हे गुंड कोण आहेत. याचा…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” नेहा बोरा ; एक अभ्यासू व आक्रमक नेतृत्व, आज आपण एक अशा व्यक्तींची माहिती घेणार आहोत, जीने गेल्या तीन महिन्यात केंद्र सरकारला अनेक हादरे दिले. २९ वर्षाची ही तरुणी मूळची खटीमा, उधमसिंग नगर, उत्तराखंड येथे राहणारी, वडील भारतीय लष्कराच्या सेवेत, या तरुणीचे नांव आहे नेहा बोरा. नेहाचे बालपण विविध शहरामध्ये गेले. त्या हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठ,येथून समाजशास्त्राची पदवीधर झाली. तीचे पदव्युत्तर शिक्षण दिल्लीच्या डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठात झाले. सध्या ती पी.एचडी करत आहे.त्यासाठी जेएनयूच्या स्कुल ऑफ आर्टस् अँड एस्थेटिक्स स्टडीजमध्ये संशोधन करत आहेत. दिल्लीच्या प्रसिद्ध पथनाट्य ग्रुप ” संगवारी, ” सोबत काम करते. त्यामुळे थियेटर…
दीपक मोहिते, हल्लाबोल, वाढवण बंदर ; स्थानिक ग्रामस्थाचे समुद्रात उतरून आंदोलन, गेल्या महिन्यापासून डहाणू तालुक्यातील वाढवण व वरोर गावातील भूमिपुत्र, वाढवण बंदरा विरोधात जीवाच्या आकांताने लढत आहे. या बंदराचे काम नुकतेच सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील शेकडो गावकऱ्यांनी समुद्रात धाव घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन गावकऱ्यांना ताब्यात घेतले. प्रस्तावित बंदराच्या कामाला पुन्हा सुरुवात होताच या दोन गावातील गावकऱ्याचा संताप उफाळून वर आला. शेकडो गावकऱ्यांनी समुद्राकडे धाव घेतली. त्यामध्ये महिला तरुण, तरुणी लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रात उतरून त्यांनी मानवी साखळी केली व ” वाढवण बंदर रद्द करा, “…
