- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- कैसा हराया….?
- रियल इस्टेट व्यवसाय, हा नियोजनबद्ध विकासाचा पाया होऊ शकत नाही,
- निर्गुंतवणुकीचे धोरण पुन्हा सक्रिय ; बँकिंग क्षेत्रापासून सुरुवात, आयडिबीआयची ६०.७२ % मालकी फेअरफॅक्सकडे…
- पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे महत्वाचे आहे,
- माजी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या राजकारणाला ओहोटी,
- पर्यटन,उपजीविका व मूलभूत सुविधावर भर द्या – मनोज रानडे,
- येणाऱ्या काळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार रसातळाला जाणार…
- वाढवण बंदर प्रकल्पबाधित भूधारकांसाठी २५ ऑक्टो. रोजी विशेष शिबिराचे आयोजन,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, कैसा हराया….? ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेली आणि आपल्या आक्रमक भाषणांमुळे राज्यभरात चर्चेत आलेली नगरसेविका सहर शेख हीचे वडील युनुस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. युनुस शेख यांना पक्षात प्रवेश देताच त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे ठाणे आणि कळवा-मुंब्र्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. शिवसेनेतील ( शिंदे गट ) अनेक नेत्यांचा शेख यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होत आहे. तर भाजपचे नितेश राणे यांनी शिवसेनेने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीरपणे सुचवले आहे. युनुस शेख यांच्या पक्षप्रवेशाचे छायाचित्र समोर आले असून, यामध्ये…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” रियल इस्टेट व्यवसाय हा नियोजनबद्ध विकासाचा पाया होऊ शकत नाही, बारा वर्षांपूर्वी नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला आणि पालघरवासीय चांगलेच सुखावले. आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, रोजगार, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, अशा अपेक्षेत असलेल्या नागरिकांचा अल्पावधीत भ्रमनिरास झाला व पूर्वी जे होते तेच बरे होतं, अशा निर्णयाप्रत ते आले. जिल्ह्याचा ग्रामीण भाग आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे. तर पालघर, बोईसर व डहाणू या शहरात रियल इस्टेट वगळता इतर क्षेत्रात ही तीनही क्षेत्रे मागासलेलीच आहेत. आज या तीन शहराची लोकसंख्या सतत वाढत आहे. या लोकसंख्या वाढीच्या तुलनेत नागरिकांना नागरी सुविधा मिळतात…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” निर्गुंतवणुकीचे धोरण पुन्हा सक्रिय ; बँकिंग क्षेत्रापासून सुरुवात – आयडिबीआयची ६०.७२ % मालकी फेअरफॅक्सकडे… केंद्र सरकारने पुन्हा एकदा निर्गुंतवणुकीच्या धोरणाला गती दिली असून, याची सुरुवात बँकिंग क्षेत्रापासून केली आहे. १४ ऑक्टो.रोजी झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत आयडिबीआय बँकेतील ६०.७२ % हिस्सा कॅनडा स्थित फेअरफॅक्स फायनान्शीयल होल्डिंगला विकण्यास मंजुरी देण्यात आली. सरकारचा ३०.४८ % आणि एलआयसीचा ३०.२४ % हिस्सा अशा एकूण ₹ ५२ हजार ८७८ कोटीवर हा व्यवहार होणार आहे. विक्रीनंतरही सरकारकडे १५ % आणि एलआयसीकडे १९ % हिस्सा राहणार आहे. सरकारच्या मते, हा निर्णय बँकेच्या भल्यासाठी आहे. खाजगी भांडवल आल्यामुळे बँकेची कार्यक्षमता वाढेल, नवीन तंत्रज्ञान येईल आणि…
दीपक मोहिते, जलसक्षरता, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे महत्वाचे आहे, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे राज्याच्या सुमारे २६५ तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना सरकारची चांगलीच दमछाक होत आहे. या ज्वलंत विषयी आपण वेळीच सावध होण्याची गरज आहे.२०२७ चे पहिले सहा महिने ( जाने.- जून २०२७ ) आपल्यासाठी कसोटीचा काळ ठरणार आहे. भीषण दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई, भुगर्भातील पाण्याचा अविरत उपसा व अल निनोचे आक्रमण, अशा नैसर्गिक संकटानी आपण चहूबाजूनी घेरले जाणार आहोत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाने जलसाक्षरतेचे महत्व जाणून घेणे गरजेचे आहे. पाण्याची बचत, उपलब्ध पाण्याचा जपून वापर, रेन हार्वेस्टिंग, समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून साठा करणे,…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” माजी आ. हितेंद्र ठाकुर यांच्या राजकारणाला ओहोटी, लोकसभा, विधानसभा निवडणूकीत दारुण पराभव झाल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काठावर विजय मिळवणाऱ्या माजी आ. हितेंद्र ठाकूर यांची सद्दी आता संपल्यात जमा आहे. ज्या हितेंद्र ठाकूर यांच्याशिवाय राज्यस्तरावर भाजप अन्य राजकीय पक्षाचे पान हलत नसे, त्या हितेंद्र ठाकूर यांची राजकीय पक्षाना आता गरज उरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी विधान परिषद, पदवीधर, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधून आमदारकी पटकावण्यासाठी अनेक राजकीय पक्षाचे नेते ठाकूर यांच्या दरबारी दाखल होत असत. मात्र गेल्या दोन वर्षात ठाकूर यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला व गर्दी पार ओसरत गेली. एकेकाळी विवा कॉलेजच्या आवारात जी जत्रा पाहावयास मिळायची ती…
दीपक मोहिते, पर्यटन, उपजीविका व मूलभूत सुविधांवर भर द्या – मनोज रानडे, ग्रामीण भागाच्या विकासासाठी मूलभूत सुविधा, स्थानिक रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि पर्यटन विकास यांना प्राधान्य देऊन शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिले. रानडे यांनी १३ ऑक्टो. रोजी मोखाडा तालुक्यातील किनिस्ते येथील जि. प. केंद्र शाळेत स्पार्क फाउंडेशन व किनिस्ते ग्रामस्थांच्या सौजन्याने बांधण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचे उद्घाटन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या सभामंडपाला पद्मश्री भिकल्या धिंडा सभागृह असे नाव देण्यात आले असून त्यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले. यावेळी स्पार्क फाउंडेशनचे संचालक मकरंद दीक्षित, किनिस्ते सरपंच योगेश दाते, उपसरपंच…
दीपक मोहिते, येणाऱ्या काळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार रसातळला जाणार… ११ ऑक्टोबर २०२६ राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी खैबर पख्तूनख्वा राज्यात आणीबाणी लावली आहे. संविधानाच्या कलम २३२ आणि २३४ अंतर्गत झरदारी यांनी वरील कारवाई केली आहे.सतत होणाऱ्या दहशतवादी हल्यामध्ये झालेली वाढ, प्रांतीय सरकार दहशतवादाविरुद्ध लढण्यात अपयशी,” इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक इन्साफ पक्षाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इम्रान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबादकडे लॉन्ग मार्च काढला होता, इम्रान खान यांच्या सुटकेसाठी, तो रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.अशी बिकट परिस्थिती असताना लष्करप्रमुख असीम मुनीर हे सध्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. पाकिस्तानात सध्या…
दीपक मोहिते, वाढवण बंदर प्रकल्पबाधित भूधारकांसाठी २५ ऑक्टो. रोजी विशेष शिबिराचे आयोजन, वाढवण बंदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे बाधित होणाऱ्या भूधारकांना त्यांचा मोबदला व इतर अनुज्ञेय लाभ पारदर्शकपणे, वेळेत आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. या अनुषंगाने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज प्रांत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन आवश्यक ते निर्देश दिले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया सध्या टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये प्रकरणाची कागदपत्रे, अभिलेखांची पडताळणी, वारस नोंद तसेच मालमत्तेतील हिश्श्याची गणना यांसारख्या बाबी अद्याप प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे वैयक्तिक तसेच एकत्रितपणे तपासून भूधारकांच्या सोयीच्या पद्धतीने निकाली काढावीत, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला आहे.…
दीपक मोहिते, नालासोपारा-वसई लिंक मार्गावर अग्नितांडव, दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू, नालासोपारा-वसई पूर्व दरम्यान असलेल्या लिंक रोडवर इम्पिरियल इमारतीच्या १४ व्या मजल्यावर काल मध्यरात्री भीषण आग लागली.आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले, आपला जीव वाचवण्यासाठी एका कुटुंबातील चार जणांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका कुटुंबातील चार जणांना संकटातून बाहेर काढण्यात यश आले. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील समजू शकलेला नाही.या घटनेत दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला.फाल्गुनी शहा ( ५० ) व अश्विनी पारकर ( ५० ) अशी या महिलांची नांवे आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दीपक मोहिते, ” आश्चर्यकारक, गुजरात राज्यातील स्था.स्व.संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजप सरस ; सारे विरोधी पक्ष भुईसपाट, देशभरात भाजपविरोधात वातावरण असताना भाजपने गुजरात राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षाना चांगलीच धूळ चारली आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या होम ग्राऊंडवर घेरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. गुजरात राज्यातील १५ महानगरपालिका, ८४ नगरपालिका व जिल्हा / पंचायत समित्यांच्या निवडणुकासाठी १२ ऑक्टो. रोजी मतदान पार पडले. काल झालेल्या मतमोजणीमध्ये, गांधीनगर महापालिका – एकूण ४४ जागापैकी भाजपने ३८ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम…
