दीपक मोहिते,
नालासोपारा-वसई लिंक मार्गावर अग्नितांडव, दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू,
नालासोपारा-वसई पूर्व दरम्यान असलेल्या लिंक रोडवर इम्पिरियल इमारतीच्या १४ व्या मजल्यावर काल मध्यरात्री भीषण आग लागली.आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले, आपला जीव वाचवण्यासाठी एका कुटुंबातील चार जणांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका कुटुंबातील चार जणांना संकटातून बाहेर काढण्यात यश आले. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील समजू शकलेला नाही.या घटनेत दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला.फाल्गुनी शहा ( ५० ) व अश्विनी पारकर ( ५० ) अशी या महिलांची नांवे आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

